मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
कपाशी पिकातील फरदड घेणे टाळा : डॉ. पवार
अंबड, जि. जालना : ‘‘किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होते. म्हणून शक्यतो फरदड घेणे शेतकऱ्यांनी टाळावे,’’ असा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येथील सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिला.
अंबड, जि. जालना : ‘‘मराठवाड्यात कपाशीच्या दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या संकरित वाणांवर गुलाबी बोंड अळीच्या जास्त पिढ्या तयार होतात. परिणामी, या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होते. म्हणून शक्यतो फरदड घेणे शेतकऱ्यांनी टाळावे,’’ असा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येथील सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिला.
जालन्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे व तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कापूस पिकातील फरदड मुक्त अभियान’ सप्ताहनिमित्त कृषी विभाग, अंबडतर्फे शहागड येथे युवा शेतकरी बद्रीनारायण ढवळे यांच्या शेतात कार्यक्रम घेण्यात आला.
डॉ. पवार म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचलित पऱ्हाटी, कॉटन श्रेडरचा उपयोग करून कापूस शेतातून काढून टाकावा व बारीक करावा. फरदड घेतल्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाचे नियोजन करावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ते नोव्हेंबरमध्ये होतो. नोव्हेंबरनंतर शेताला पाणी दिल्याने गुलाबी बोंडअळी वाढीला चालना मिळते.’’
‘‘फरदड कापूस घेतल्यामुळे जमिनीमध्ये फुजारियम मर, मुळ सड़ने इ. मृदाजन्य रोगकारक बुरशीचा प्रसार आणि फैलाव होतो. पांढरी माशी व इतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. पीक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर, वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो. रब्बी हंगामातील एका पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही,’’ असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
कृषी सहायक अशोक सव्वाशे, विजय जाधव,अंकुश जूमडे, लहू क्षीरसागर, प्रदीप चौरे, सावता लगड, भागवत लगड, रामदास येटाळे, संतोष येटाळे, उद्धव मिसाळ, संदीप टोपे, अमोल खरात, सतीश तिळवणे उपस्थित होते.
- 1 of 1029
- ››