बोदवड तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ

जामठी, जि.जळगाव ः शासनाच्या आदेशाला बोदवड येथील बँकेने केराची टोपली दाखविली आहे. कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकेतून टाळाटाळ केली जात आहे.
 Avoid giving crop loans to farmers in Bodwad taluka
Avoid giving crop loans to farmers in Bodwad taluka

जामठी, जि.जळगाव ः बोदवड येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. शासनाच्या आदेशाला बोदवड येथील बँकेने केराची टोपली दाखविली आहे. कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकेतून टाळाटाळ केली जात आहे.

 महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत खंड पडू नये, शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिध्द केली आहे. पात्र शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध व्हावे व पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होवू नये, असे आदेश सरकारने राज्यातील सर्व बँकांना दिले आहेत. पण, बोदवडची राष्ट्रीयीकृत  बँक त्याला अपवाद ठरत आहे.

निवेदनानुसार, खरीप पीक कर्जवाटपाची मुदत सप्टेंबरअखेर असताना बोदवड येथील स्टेट बँक शेतकऱ्यांना विविध कारणे दाखवून माघारी पाठवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली तरी, विविध कागदपत्रांची मागणी शाखेतून केली जाते. अशा बॅंकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश असल्यावर सुद्धा बँकेत शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.  

खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही बँकेने एकाही शेतकऱ्यांला पीककर्ज दिलेले नाही. शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. शासन निर्णयाला सुध्दा ही बँक जुमानत नाही. याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. - योगेश शेळके,  शेतकरी,  जामठी  (जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com