‘बोंड अळी’ रोखण्यासाठी फरदड कापूस पीक घेणे टाळा'

‘बोंड अळी’ रोखण्यासाठी  फरदड कापूस पीक घेणे टाळा
‘बोंड अळी’ रोखण्यासाठी फरदड कापूस पीक घेणे टाळा

जळगाव ः गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच पुढील वर्षी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस पिकाची फरदड घेऊ नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

कापूस पीक शेतातून डिसेंबरअखेर पूर्णतः काढून टाकावे. त्यानंतर ५ ते ६ महिने शेत पूर्णपणे कापूस विरहित ठेवल्यास शेंदरी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्टात येऊन पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. शेंदरी बोंड अळी डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु, फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावरही तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो.  कापसाच्या पिकाचा हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. कपाशीच्या पऱ्हाट्यांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने गंजी करून शेतबांधावर ठेवू नये, पीक काढणीनंतर पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. जिनिंग-प्रेस मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. जेणेकरून तेथे अस्तित्वात असलेल्या गुलाबी बोंड अळींना नष्ट करता येईल. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस शेतातील कापूस पऱ्हाट्या व त्याचा पालापाचोळा पूर्णपणे नष्ट करून कापसाची फरदड घेऊ नये. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com