Agriculture news in marathi; Avoiding action on the buying and selling team of Chandwad taluka | Agrowon

चांदवड तालुका खरेदी-विक्री संघावर कारवाईबाबत टाळाटाळ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने अनधिकृत ठिकाणी बेकायदा ठेवलेल्या मालाचा साठा तालुका कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. मात्र तीन महिन्यांनंतरही या प्रकरणाबाबत अद्याप कारवाई झालेली नाही. कारवाईबाबात टाळाटाळ होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र खंगाळ यांनी केला आहे. 

नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने अनधिकृत ठिकाणी बेकायदा ठेवलेल्या मालाचा साठा तालुका कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. मात्र तीन महिन्यांनंतरही या प्रकरणाबाबत अद्याप कारवाई झालेली नाही. कारवाईबाबात टाळाटाळ होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र खंगाळ यांनी केला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला श्री. खंगाळ यांनी ३० मे व ६ जून रोजी कारवाई करण्याबाबत प्रत्यक्ष पत्र दिले. त्यांच्या तक्रार अर्जाचा विचार करून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला गुरुवारी (ता. ६) पत्राद्वारे चांदवड खरेदी- विक्री संघाच्या परवान्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कारवाई न करता त्यासंबंधीचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला प्राप्त करून न दिल्याने राजेंद्र खंगाळ यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण पुकारले होते.

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांनी सोमवारी (ता. १०) लेखी पत्र देऊन तत्काळ कारवाई करण्याबाबत आश्वासन दिल्याने श्री. खंगाळ यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, चार दिवस उलटूनही अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.दरम्यान, वरील प्रकरणी कोणताही अहवाल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला प्राप्त झालेला नाही, अशी माहिती संपर्क साधल्यानंतर देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई का होत नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागील नेमके धागेदोरे काय ते तपासांती येणाऱ्या अहवालातून स्पष्ट होणार आहे.

वरिष्ठ कार्यालयाच्या पत्रव्यवहाराचा अवमान 
चांदवड खरेदी- विक्री संघाने परवाने निलंबन तारखेचा होलसेल, किरकोळ गोडावूननिहाय शिल्लक मालाची केलेल्या तपासणीनुसार विनापरवाना अनधिकृत व बेकायदेशीर ठिकाणी रासायनिक खतांचा साठा व विक्री आढळून आल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची राजेंद्र खंगाळ यांनी मागणी केली होती. याबाबत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने गुरुवारी (६) व सोमवारी (१०) तत्काळ कारवाईचे पत्र देऊनही चांदवड खरेदी- विक्री संघावर कारवाई झालेली नाही. त्याबाबत अहवालही पाठविलेला नाही. यामुळे वरिष्ठ कार्यालयाचा हा अवमान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...