कडाक्याच्या थंडीची अजूनही प्रतीक्षा 

कडाक्याच्या थंडीची अजूनही प्रतीक्षा 
कडाक्याच्या थंडीची अजूनही प्रतीक्षा 

पुणे ः डिसेंबर महिना संपत आला तरी, अजूनही राज्यातील अनेक भागांत गारठा फारसा वाढलेला नाही. यामुळे अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा कायम असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने गारठा कमी अधिक होत आहे. येत्या दोन ते चार दिवसांत गारठ्यात चढउतार होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारठा वाढला आहे. शनिवारी (ता. २१) सकाळी विदर्भातील चंद्रपूर येथे येथे १०.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या राज्याच्या काही भागांत वातावरण अंशतः ढगाळ असल्याने दुपारच्या उकाड्यात वाढ होत आहे. यामुळे गारठा कमी होऊन किमान तापमानात वाढ होत असून, अनेक ठिकाणी किमान तापमानात चढउतार सुरू आहे. नाशिक, चंद्रपूर जिल्ह्याच्या परिसरात हवामान कोरडे झाल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. चंद्रपूरमध्ये सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट झाली असून, सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ निफाड येथेही ११.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात गारठा कमी असल्याने पुणे, महाबळेश्‍वर, नगर, औरंगाबाद येथील किमान तापमानात किचिंत वाढ झाली होती. त्यामुळे किमान तापमान बारा अंश सेल्सिअसच्या वर होते. 

कोकणात हवामान किंचित ढगाळ असल्याने काही प्रमाणात गारठा कमी अधिक असल्याने किमान तापमान १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. या भागात आणखी काही दिवस तापमान कमी अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत गारठ्यात चढउतार सुरू आहे. महाबळेश्‍वर, पुणे, नगर, सातारा, नाशिक या भागांत किंचित गारठा आहे. त्यामुळे किमान तापमान १४ ते १६, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागांत १७ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यातही गारठा कमी अधिक आहे. परभणीतील कृषी विद्यापीठात १३.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर उर्वरित भागात किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअसपर्यत होते. विदर्भातील अनेक भागांत गारठा आहे. यामुळे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील तापमान १२ ते १६ अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  नगर १४.६ (३), अकोला १५.० (२), अलिबाग २१.९ (४), अमरावती १५.४ (१), औरंगाबाद १४.२ (३), बीड १६.८ (४), बुलडाणा १६.० (२), चंद्रपूर १०.६ (-२), डहाणू २१.४ (३), गोंदिया १२.८ (१), जळगाव १६.२ (५), कोल्हापूर १८.३ (३), महाबळेश्‍वर १४.० (१), मालेगाव १७.० (६), धुळे कृषी महाविद्यालय १३.४, मुंबई २१.१ (३), नागपूर १३.१ (१), नांदेड १५.० (३), नाशिक १५.१ (५), नवी मुंबई १६.५, निफाड ११.२, उस्मानाबाद १४.२ (१), परभणी १४.६ (२), परभणी कृषी विद्यापीठ १३.५, लोहगाव १६.७ (६), पाषाण १६.१ (५), पुणे १५.९ (५), रत्नागिरी २१.१ (१), सांगली १७.६ (४), सातारा १५.९ (३), सोलापूर १८.८ (४), वर्धा १५.४ (२), यवतमाळ १६.४ (२) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com