नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता.३) सायंकाळी सात वाजल्यापासून शुक्रवारी (ता.४) सकाळपर्यंत जागरण गोंधळ करत आत्मक्लेष जागर आंदोलन करण्यात आले.
सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता.३) सायंकाळी सात वाजल्यापासून शुक्रवारी (ता.४) सकाळपर्यंत जागरण गोंधळ करत आत्मक्लेष जागर आंदोलन करण्यात आले.
दिल्लीमध्ये लाखो शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. परंतु, केंद्र सरकार पोलिस बळाचा वापर करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. या कायद्यांत असणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात. कायद्याने हमीभाव देणे बंधनकारक करावे. अन्यथा, हा कायद रद्द करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत लवकर दखल घ्या, अशी मागणी देशातील सर्व शेतकरी संघटनांनी केली.
त्याच मागणीला अनुसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा दर्शविण्यासाठी या आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार सोलापुरात संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, दिनेश गाडेकर, अमर इंगळे, आजिनाथ परबत आदींसह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर थंडीत जागर करत हे आंदोलन केले.
- 1 of 1028
- ››