पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान अन्य शेतकऱ्यांना द्यावे : कृषी आयुक्त

जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण
जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण

बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्राची शेतीतील प्रतिमा उंचावण्याचे काम करून जगभरातील शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान पुरवत आहे, त्याप्रमाणे पुरस्कार मिळवलेल्या शेतकऱ्यांनी आपले शेती विकासातील ज्ञान अन्य शेतकऱ्यांना द्यावे, असे मत कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले.

कृषी विभाग, आत्मा व केव्हीके बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २०) शारदानगर येथे आयोजित जिल्हास्तरीय शेतकरी व शेतकरी गट पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या शेतकऱ्यांना व शेतकरी गटांना गौरविण्यात आले. त्या वेळी आयुक्त सिंह बोलत होते. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली आदी उपस्थित होते.

डॉ. सिंह म्हणाले, की शेती फार कठीण अवस्थेतून जात आहे आणि आम्ही विस्ताराबाबत कमी पडत आहोत. असे असले तरी देखील जे शेतकरी जिद्दी आहेत, ते पुढे जातच राहतील. त्यासाठी बारामती केव्हीकेसारख्या संस्था मदतीसाठी आहेत. या वेळी नवलकिशोर राम, दिलीप झेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. आत्माचे संचालक अनिल देशमुख यांनी प्रास्ताविक केले.

पुरस्कारप्राप्त शेतकरी गट शेतकरी गटांना वीस हजार रुपये तर शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. उत्कृष्ट पुरस्कार मिळालेल्या शेतकरी गटांमध्ये रायरेश्वर सेंद्रिय शेती गट (भोर), संजीवनी सेंद्रिय शेती विकास गट (वेल्हा), आंदरमावळ सेंद्रीय शेती गट (मावळ), भैरवनाथ सेंद्रीय महिला बचत गट (मुळशी), ऋचा महिला शेतकरी भात व भाजीपाला उत्पादक बचत गट (हवेली), इंद्रायणी कृषी सेवा मंडळ (खेड), श्रीरामबाबा पुरुष कृषी विकास गट (आंबेगाव), श्री ज्ञानेरबाबा कृषी बचत गट (जुन्नर), श्रीराम शेतकरी मंडळ (शिरूर), गोधन पशुपालन शेतकरी बचत गट (बारामती), सुर्योदय विकास केंद्र (इंदापूर), कृषी संजीवनी सेंद्रीय शेतकरी गट (दौंड) यांचा समावेश होता.

तालुकानिहाय पुरस्कार प्राप्त शेतकरी शिरूर - गीताराम कदम, मच्छिंद्र झोडगे, महादु वाव्हळ. बारामती - प्रशांत शेंडे, शरद पवार, महादेव कोकरे. इंदापूर - अतुल शिंगाडे, संतोष राऊत, अजिंक्य हंगे. दौंड - धनंजय आटोळे, समीर डोंबे, ईश्वर वाघ. पुरंदर - श्रीरंग कडलग, अतुल सस्ते, संदीप काळाणे. भोर - रविंद्र नांदे, दादासाहेब पवार, अनिल बांदल. जुन्नर -  पल्लवी हांडे, प्रकाश नेहरकर,विकास चव्हाण. वेल्हा - अनंता निवगुणे, गणपत गुजर, लक्ष्मण खेडेकर. मावळ - बजाबा मालपोटे, नितीन गायकवाड, कुंडलिक जोरी. मुळशी - संतोष पवळे, प्रताप ढमाले, नवनाथ जाधव. हवेली - राहुल हापसे, बाळासाहेब चव्हाण, नेहा घावटे. खेड - कैलास डावरे, भानुदास दरेकर, रामदास लांडगे. आंबेगाव - बाळू कोळप, विश्वास सैद, कोंडाजी सणस.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com