बळिराजाच्या लेकीसुनांचा आज सत्कार

बळिराजाच्या लेकीसुनांचा आज सत्कार
बळिराजाच्या लेकीसुनांचा आज सत्कार

बारामती, जि. पुणे: शेती शाश्वत उरली नाही म्हणणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असताना त्याच समस्यांचा सामना निकराने करीत शेतीत स्वकर्तृत्वाचा ओअॅसिस निर्माण केलेल्या राज्यभरातील बळिराजाच्या २६ लेकीसुनांचा सन्मान आज (ता. ९) शारदानगर येथे होणार आहे. यामध्ये लोणवाडी (नाशिक) येथील ज्योत्स्ना दौंड हिचाही समावेश आहे. वडिलांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आल्यानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी सांभाळणाऱ्या ज्योत्स्ना दौंड या शेतकरी युवतीचा शारदानगर येथे सन्मान होणार आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघामार्फत दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. यावर्षी राज्यभरातील बळिराजाच्या २६ लेकीसुनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रसिद्धीपासून कोसो मैल दूर अललेल्या, दररोज आपल्या कुटुंबासह समाजाचे हित पाहणाऱ्या व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा रथ अधिक जोमाने ओढणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे.  शेती व पूरक व्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, निर्यात अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा समावेश या पुरस्कारासाठी करण्यात आला असून, यामध्ये कांताबाई सावंत (किल्लारी, ता. औसा), मीराबाई जाधव (बिजोट, ता. बागलाण), विद्या रानरुई (आढीव, ता. पंढरपूर), अर्चना धर्मशेट्टी (मन्नाथपुर, ता. निलंगा), वेणूताई माळवे (शिंदेवाडी, ता. इंदापूर), मनीषा घडवजे (तिसगवा, दिंडोरी), रंजना दुगजे (मानेरेवाडी, ता. दिंडोरी), वनिता पिंगळे (गणेशनगर), मनीषा  गावडे (गावडेवाडी, ता. आंबेगाव), अनिता गाडेकर (नारायणगाव, ता. जुन्नर), लता संधान (चिंचखेड ता. दिंडोरी), सुजाता पाटील (निमणी ता. तासगाव), सविता वाबळे (शिवडी, ता. निफाड), दीपाली भोर ( आर्वी, ता. जुन्नर), सोनाली सोनवणे (खेडगाव, ता दिंडोरी) जोत्स्ना दौंड (लोणवाडी, ता. निफाड), शकुंतला संकपाळ (झरेगाव, ता. बार्शी) बबई साठे (जवळका, ता. जामखेड), रत्नमाला जाधव (टाकळी), मंदाकिनी लाढाने (डिकसळ जि. अहमदनगर), स्नेहलता सावरकर ( करंजी जिल्हा वर्धा), मनीषा पवार (पोर्ली, जि. गडचिरोली), प्राजक्ता आदमणे (गडचिरोली), वैशाली पाटील (दसनूर, जि. जळगाव), वैशाली वीरकर (जाधववाडी, ता. माण), सोनाली काटकर (किरकसाल, ता. माण) आदींचा या कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com