Agriculture news in marathi, Awareness about nutritious diet is important: Dr. Marathe | Agrowon

पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची : डॉ. मराठे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक आहे. त्यादृष्टीने आहारात त्याचा प्राधान्याने समावेश असावा. विशेषतः माता-बालकांसाठी पोषक आहार अधिक महत्त्वाचा आहे. त्याबाबत विशेष जागरूकता  महत्त्वाची आहे’’, असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी व्यक्त केले.

सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक आहे. त्यादृष्टीने आहारात त्याचा प्राधान्याने समावेश असावा. विशेषतः माता-बालकांसाठी पोषक आहार अधिक महत्त्वाचा आहे. त्याबाबत विशेष जागरूकता  महत्त्वाची आहे’’, असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी व्यक्त केले.

केगाव येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे आंतरराष्ट्रीय भरड धन्य वर्ष निमित्ताने रोपे व पोषण पाकिटे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. मराठे बोलत होते. संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा, शास्त्रज्ञ डॉ. नम्रता गिरी या वेळी उपस्थित होत्या. 

डॉ. मराठे म्हणाले, ‘‘आपण खऱ्या अर्थाने आपले पौष्टिक अन्न ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर विसरलो आणि गहूयुक्त आहाराचा अतिरेक केला. म्हणून आपले आरोग्य अनेक आजारांनी बाधित झाले. एकेकाळी लोकं म्हणायचे मातेला पोषक आहार असेल, तर सुदृढ बाळ जन्माला येते. पण त्यासाठी पोषक आहाराबद्दल माता देखील जागरूक असायला हवी. त्याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सर्वस्तरात अधिकाधिक जागरुकता महत्वाची आहे.’’

डॉ. शर्मा म्हणाल्या, ‘‘घरातील महिला ही सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते. तिचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असावा. त्यामागचा उद्देश लक्षात घेऊन महिलांनी पोषक आहाराकडे 
लक्ष द्यावे.’’ 

या वेळी सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींना भरडधान्य युक्त पोषण पाकिटे वाटप करण्यात आली. डाळिंबाच्या सोलापूर लाल वाणाची नोंदणी केलेलल्या शेतकऱ्यांना डाळिंबांची रोपे वाटण्यात आली. शास्त्रत्र डॉ. नम्रता गिरी यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड यांनी आभार मानले.


इतर बातम्या
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने उरलेल्या...नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी...
परागवाहकांचे जैवविविधता संवर्धनातील...परागवाहकांशिवाय फुले येणाऱ्या वनस्पतींपैकी तिसरी...