सिंदेवाही केव्हीकेत खतविषयक जागृती

सिंदेवाही केव्हीकेत खतविषयक जागृती
सिंदेवाही केव्हीकेत खतविषयक जागृती

चंद्रपूर  ः केव्हीके सिंदेवाहीच्या वतीने खत वापरविषयक जागरूकता, तसेच रब्बी हंगामपूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते होते. मार्गदर्शक म्हणून सहयोगी संशोधन संचालक डॉ. उषा डोंगरवार, नागभीड उपविभागीय कृषी अधिकारी डी. एम. तापसकर, चंद्रपूरचे दत्ता काळे, सिंदेवाही तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. भारती, श्री. दळवी, डॉ. पी. के. राठोड यांची उपस्थिती होती. डॉ. विजय सिडाम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी. के. राठोड यांनी खताचा संतुलित वापर करण्याची आवश्‍यकता व्यक्‍त केली. त्याकरिता पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी माती परीक्षणावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी खत, पाणी यांचा संतुलित आणि मर्यादित वापराविषयीची माहिती दिली. डॉ. उषा डोंगरवार यांनी जैविक खतांचे महत्त्व तसेच सेंद्रिय शेतीपद्धतीत त्यांचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले.  डॉ. व्ही. जी. नागदेवते यांनी शेतीकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची आज गरज असल्याचे मत मांडले. शास्त्रोक्‍त पद्धतीने शेती केली आणि व्यावसायिक पीकपद्धतीचा अबलंब केला तरच शेती फायद्याचे ठरते, असे ते म्हणाले. रब्बी पीक व्यवस्थापनाविषयी देखील या वेळी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांना या वेळी कृषी संवादिनी आणि घडीपत्रिकांचे वितरण करण्यात आले. या वेळी डॉ. सोनाली लोखंडे, प्रा. स्नेहा वेलादी, अमित हातझाडे, नीलकमल बारसागडे, संतोष पवार, व्ही. जी. माने यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वेलादी यांनी केले. डॉ. विजय सिडाम यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com