Agriculture news in marathi Ayaram's blow to BJP; Capture of fort from Congress-NCP | Agrowon

भाजपला दिला आयारामांनी झटका...

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच वर्षांपूर्वी भाजपने अगदी काठावरचे बहुमत घेऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र अंतर्गत नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्तांतर केले.

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच वर्षांपूर्वी भाजपने अगदी काठावरचे बहुमत घेऊन सत्ता स्थापन केली होती. भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रात सत्ता रोवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अडीच वर्षांत महापालिकेत बरीच खलबते झाली. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अंतर्गत नाराजी नाट्य सुरू झाले. त्याचाच फायदा घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्तांतर करण्याची चक्रव्यूह आखला आणि त्या चक्रव्यूहात भाजपचे नेते अडकले. 

अडीच वर्षांपूर्वी राज्यात भाजपची सत्ता असताना सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत भाजपचे ४१ सदस्य निवडून आले. स्व:बळावर पहिल्यांदाच सत्ता आली. त्यामुळे महापालिकेवर असलेली कॉँग्रेसची सत्ता संपुष्टात आली होती. मात्र, भाजपला मिळालेली सत्ता बहुतांश राष्ट्रवादीमधून फुटलेल्या नगरसेवकांमुळेच मिळाली होती. पहिले अडीच वर्षे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षीत होते. तर पुढील अडीच वर्षे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले.

दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महापालिकेच्या सत्तेमध्ये बदल होतील, अशी चर्चा सुरू झाली. सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेले नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्यासाठी चुळबूळ करू लागले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला जनतेने पाच वर्षांसाठी सत्ता दिली आहे, ती त्यांनी सांभाळावी, असे सांगत सत्तांतराकडे दुर्लक्ष केले होते.

गेल्या वर्षभरात सत्तेमध्ये असलेल्या भाजपच्या नगरसेवकांमधून नाराजी समोर येत होती. या सदस्यांची मोट बांधण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. परिणामी गेल्या दीड दोन महिन्यांत भाजपांतर्गत असंतोष, नाराजी उफाळून आली. त्यातच ओबीसी महिला प्रवर्गाची मुदत संपली. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेत सत्तांतराचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे, असा संदेश त्यांनी स्थानिक नेत्यांना दिला आणि भाजपची सत्ता उलथून लावण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली.

महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ अधिक होते, त्यामुळे काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे, अशी भूमिका होती. दरम्यान, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील आणि काँग्रेसचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यात महापौर आणि उपमहापौरसाठी चर्चाही झाली. पुढची अडीच वर्ष सत्तेत राहण्यासाठी या दोन पक्षांचा किमान समान कार्यक्रम अर्थात सत्तेचा फॉर्म्युला ठरला असून, सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद वाटून घेण्याचे ठरले आहे. मात्र या बाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत वक्तव्य केलेले नाही. हा फॉर्म्युला वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनंतर जाहीर करण्यात येणार आहे.

पहिली सव्वा वर्ष महापौरपद राष्ट्रवादीला देण्यात आले. तर उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती सभापती काँग्रेसकडे देण्यात येणार आहे. या नंतर पुढच्या सव्वा वर्षात महापौरपद काँग्रेसकडे तर उरलेली पदे राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यात येणार आहेत. खासदार संजय पाटील यांना साऱ्या गोष्टी माहिती होत्या. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष कसे केले, असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी सत्ता राखण्यासाठी किती प्रयत्न केले, हे देखील पाहणे तितकेच आवश्यक आहे. दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण लाड यांच्या विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगली महानगरपालिकेच्या रूपाने दुसरा धक्का दिला आहे.  

 

 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...