agriculture news in marathi, babanrao lonikar says fund declared for cleaning, mumbai, maharashtra | Agrowon

पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या स्वच्छतेसाठी ५ कोटी : मंत्री बबनराव लोणीकर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़, सातारा तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे. तो लवकरच सुरळीत करणार असून, पूरग्रस्त गावांतील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतीच (ता. १३) दिली.

मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़, सातारा तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे. तो लवकरच सुरळीत करणार असून, पूरग्रस्त गावांतील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतीच (ता. १३) दिली.

पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजना व स्वच्छतेबाबतची आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी श्री. लोणीकर बोलत होते. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अपर मुख्य सचिव शामलाल गोयल व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. लोणीकर म्हणाले, की कोल्हापूर, सांगली व सातारा या भागांतील पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे ६०४, सांगलीमध्ये १३०, साताऱ्यामध्ये ९८ पाणीपुरवठा योजना या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. तसेच राज्यातील इतर पूरग्रस्त भागांतील योजनाही क्षतिग्रस्त झाल्या आहेत.  

मंत्री लोणीकर म्हणाले, की या सर्व भागांतील स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या उपाययोजना राबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची तातडीने तपासणी करावी. त्या ठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरीनचा वापर करून जे पाणी पिण्यायोग्य आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा. तसेच या भागातील जे जलस्रोत दूषित आहेत, त्या जलस्रोतांची तातडीने तपासणी करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, तसेच अन्य जिल्ह्यातून हातपंप दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहेत. जेणेकरून सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. 

राज्यातील पूरग्रस्त भागातील नद्यांवर तेथील गावांतील अनेक पाणीपुरवठा योजना आहेत. पुरामुळे या भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये गाळ साचणे, अनेक विहिरी ढासळल्या आहेत. तर काही ठिकाणीच्या बुजलेल्या आहेत. तेथील पाइपलाइन खराब होणे, विद्युतपंप खराब होणे. या सर्व योजनांचा सर्व्हे करून यामध्ये बाधित योजनांमध्ये कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्याचे तातडीने सर्वेक्षण करावे. तसेच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा स्तरावरून उपलब्ध होणारा निधी तातडीने वापरण्यात यावा. तसेच इतर उपाययोजनांच्या बाबतीत शासनाला एकत्रित प्रस्ताव सादर करावा. तसेच यासाठी आवश्यक तो सर्व निधी शासन त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.

राज्यातील पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली. १००० लोकसंख्येपर्यंतच्या ग्रामपंचायतींना ५० हजार तर १००० च्या पुढील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना १ लाख रुपये निधी प्राथमिक स्वरूपात त्वरित वितरित करण्यात येणार असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...
यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...
आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...
नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...
चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...
पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...
पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...