agriculture news in Marathi babanrao pachpunte aggressive on Kukadi water Maharashtra | Agrowon

‘कुकडी'च्या पाण्याबाबत बबनराव पाचपुते आक्रमक 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा ते दीड टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. मात्र, आत्तापर्यंत केवळ पाऊण टीएमसी पाणी मिळाले आहे.

नगर: श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा ते दीड टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. मात्र, आत्तापर्यंत केवळ पाऊण टीएमसी पाणी मिळाले आहे. हा अन्याय असून, अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत आहे. पाणी द्या नाहीतर जलसंपदाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला आहे. 

कर्जत-करमाळा येथील भरणे करताना मुबलक पाणी गेले. आता उद्या पारनेरचेसुद्धा भरणे होतील. श्रीगोंद्यातील शेती जाळण्याचे पाप अधिकारी करतात. हा अन्याय मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, म्हणून आहे का, असा सवाल करीत पाचपुते म्हणाले, की सद्यःस्थितीत पाणी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

अधिकाऱ्यांच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे अजूनही त्यांनी गांभीर्याने घेऊन श्रीगोंद्याला पाणी मिळवून द्यावे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. मर्यादेचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. श्रीगोंद्याचे सिंचन पूर्ण होण्यासाठी अजून हक्काचे अर्धा टीएमसी पाणी द्यावे. 

कालवा सल्लागार समितीची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झाली नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी ठरविले असते, तर व्हिडिओ कॉन्फरन्सवर घेता आली असती. अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता, की श्रीगोंद्याला हक्काचे पाणी देऊ. पण पाणी कमी येतेय असे लक्षात आल्यावर आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्या वेळी मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले होते.

मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य पाठपुरावा केल्याचे दिसून येत नसल्यामुळे श्रीगोंदे वंचित राहत आहे. वेळ आली, तर या पाणीप्रश्नाबाबत विधानसभेतही आवाज उठवू. आमदार कोणत्या पक्षाचा हे न पाहता शेतकरी केंद्रबिंदू मानून पाणी दिले पाहिजे. 
 


इतर बातम्या
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
इंदापुरातील सिंचन सर्वेक्षणासाठी पाच...पुणे : ‘‘इंदापूर तालुक्यातील प्रलंबित शेती...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...