Agriculture news in Marathi baby girl Uncleanness the villages complain directly to the PMO | Agrowon

चिमुकलीने गावातील अस्वच्छतेची कैफियत मांडली थेट 'पीएमओ'कडे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

अमरावती ः रस्त्यावरील सांडपाणी, अस्वच्छता आणि खड्ड्यांबाबत सातवीत शिकणाऱ्या एका चिमुकलीने थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले. पीएमओनेदेखील तिच्या पत्राची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छता व रस्ते दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत. तन्वी संजय बडवाईक असे या चिमुकलीचे नाव असून, तिच्या या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

अमरावती ः रस्त्यावरील सांडपाणी, अस्वच्छता आणि खड्ड्यांबाबत सातवीत शिकणाऱ्या एका चिमुकलीने थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले. पीएमओनेदेखील तिच्या पत्राची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छता व रस्ते दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत. तन्वी संजय बडवाईक असे या चिमुकलीचे नाव असून, तिच्या या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

पथ्रोट येथील रहिवासी असलेली तन्वी सातवीत शिकत आहे. तिचे वडील एका खासगी पतसंस्थेत लिपिक आहेत. शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर तन्वीचा रस्त्यावरील सांडपाणी आणि खड्ड्यांमुळे अपघात झाला होता. इतरांनाही यामुळे धोका होऊ शकतो, याची जाणीव झाल्याने चिमुकल्या तन्वीने थेट याबाबत पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला.

गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये कायमस्वरूपी असलेली घाण त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना होत असलेला दैनंदिन त्रास याचाही उल्लेख तिने पत्रात केला. पंतप्रधान कार्यालयानेदेखील तिच्या या पत्राची दखल घेतली. सुरुवातीला मुख्यमंत्री कार्यालय, त्यानंतर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, तेथून पथ्रोट पोलिस ठाण्यापर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला. ग्रामपंचायतीला खड्डे दुरुस्ती व स्वच्छता करण्याचे आदेश या पत्रातून देण्यात आले. त्या अनुषंगाने पथ्रोट पोलिसांनी ग्रामपंचायत प्रशासनासोबत संपर्क साधत खड्डे दुरुस्ती व स्वच्छतेची कार्यवाही करण्यास सांगितले. 

सरपंच गोपाल कावरे यांनी जलस्वराज योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या निकाली काढण्याचे निर्देश त्यानंतर दिले. दरम्यान गाव समस्यांबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत त्या निकाली काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या चिमुकल्या तन्वीचे या धाडसाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...