बच्चु कडू यांचा ताफा पुन्हा रोखला, मात्र तब्बल...

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीचा सामना केल्यानंतर पलवलकडे निघालेल्या महाराष्ट्राचे मंत्री बच्चु कडू यांच्या वाहनांचा ताफा गुरूवारी (ता.10) राजस्थान व हरीयाणा सीमेवर सुनैडा येथे अडविण्यात आला
बच्चु कडू यांचा ताफा पुन्हा रोखला, मात्र तब्बल...
बच्चु कडू यांचा ताफा पुन्हा रोखला, मात्र तब्बल...

नागपूर - उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीचा सामना केल्यानंतर पलवलकडे निघालेल्या महाराष्ट्राचे मंत्री बच्चु कडू यांच्या वाहनांचा ताफा गुरूवारी (ता.10) राजस्थान व हरीयाणा सीमेवर सुनैडा येथे अडविण्यात आला होता,  कुठल्याही परिस्थितीत नवी दिल्ली गाठण्याचा निर्धार व्यक्त केल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाला, मात्र चार तासांच्या वाटाघाटीनंंतर शेवटी हरियाणा सरकार नरमले, काही दुचाकी जाण्यास परवानगी देण्यात आली. यानंतर पलवल बॉर्डर वर दाखल झाल्यानंतर तेथे मुक्काम केला. भरतपूर येथून पलवलकडे हजारो शेतकऱ्यांसह बच्चु कडू निघाले होते.उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्तेच अडवून धरले असल्याने राजस्थान - हरीयाणा सीमेवरील कामान,पुनान मार्गे हा ताफा निघाला होता.मात्र पलवलपासून अवघ्या 40 किलोमिटर अंतरावर हरीयाणा पोलिसांनी बच्चु कडू यांच्या वाहनांचा ताफा रोखून धरला. पोलिसांनी ताफा अडविताच हजारो शेतकरी व बच्चु कडू आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावरच ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कुठल्या ही फरिस्थितीत बच्चु कडू यांना पलवलमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.मात्र पलवल कुठल्याही परिस्थितीत गाठण्याचा निर्धार असल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com