agriculture news in Marathi, Bachhu kadu says, farmer divide in politics and cast, Maharashtra | Agrowon

शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला : बच्चू कडू
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते दिवसेंदिवस वाढत असल्याचे भीषण चित्र आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा असला तरी तो स्वतःला न्याय मागण्याऐवजी विभागला जात आहे. समस्या न सुटण्याचे हे खरे कारण आहे. तो राजकारण, जाती-धर्मात अडकला आहे. हेच सर्व समस्यांचे मूळ असल्याचे सूचक व्यक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. 

नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते दिवसेंदिवस वाढत असल्याचे भीषण चित्र आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा असला तरी तो स्वतःला न्याय मागण्याऐवजी विभागला जात आहे. समस्या न सुटण्याचे हे खरे कारण आहे. तो राजकारण, जाती-धर्मात अडकला आहे. हेच सर्व समस्यांचे मूळ असल्याचे सूचक व्यक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. 

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाड मल्ल व कान्होबा यात्रेनिमित्त आयोजित कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानच्या ६४ व्या प्रबोधन व्याख्यानमालेत विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष निवृत्ती रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ‘राजकारण आणि समाजव्यवस्था’ या विषयावर आमदार कडू बोलत होते. 

ते म्हणाले, की शेती प्रश्नांकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. त्यासाठी आपण जात, पात, धर्म, पंथ विसरून शेतकरी म्हणून एक व्हायला हवे. आपला आवाज आपणच व्हावे. आज निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा व सर्वसामान्यांचा आवाज होण्यासाठी राजकारणात तरुण, प्रामाणिक व सेवाभावी लोकांनी येण्याची आवश्यकता आहे.

 या वेळी दिंडोरीचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, डॉ. भाऊसाहेब मोरे, विलास पाटील, शिवाजी पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर व पदाधिकारी उपस्थित होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह अनेक शेतकरी, दिव्यांग बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...