‘मनरेगा’चा कणा आर्थिक संकटात

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामरोजगारसेवकांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन निघाले नाही
The backbone of MGNREGA in financial crisis
The backbone of MGNREGA in financial crisis

चंद्रपूर ः महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामरोजगारसेवकांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन निघाले नाही. मनरेगाच्या आरटीओ (फंड ट्रान्स्फर आबजेक्ट)च्या माध्यमातून त्यांचे मानधन ग्रामपंचायतीमध्ये जमा होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या साइडमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण समोर त्यांचे मानधन अडले आहे. मानधनासोबत दोन वर्षांचा प्रवास भत्ताही या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने या कर्मचाऱ्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार हमी योजना चालविली जाते. शेततलाव, मामा तलाव, वृक्षलागवड, मजगीची कामे, पांदण रस्ते, वैयक्तिक शोषखड्डे, गुरांचा गोठा, बोडी खोलीकरण, घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना यांसह अन्य योजना या माध्यमातून राबविल्या जातात. मनरेगाअंतर्गत ही कामे सांभाळण्यासाठी काही वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने ग्रामरोजगारसेवकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात सध्या ८५५ ग्रामरोजगारसेवक कार्यरत आहेत. मनुष्यदिवस निर्मितीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन निघते. या कर्मचाऱ्यांचे दोन हजारांपासून तर १५ हजारांपर्यंत मानधन निघते. आयुक्तालयातून त्यांचे मानधन थेट ग्रामपंचायतीत जमा होते. मानधनाची पाठविण्याची प्रक्रिया आनलाइन आहे. मनरेगाच्या असलेल्या आरटीओच्या माध्यमातून त्यांचे मानधन जमा होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून साइटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण समोर त्यांचे मानधन अडविण्यात आले आहे. आक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ म्हणजेच सहा महिन्यांपासून त्यांना मानधन मिळाले नाही. २०१९-२०, २०२०- २१ या वर्षांचा प्रवासही भत्ताही मिळाला नाही. किलोमीटरच्या आधारावर त्यांचा प्रवास भत्ता निघतो. मात्र, तोही आतापर्यंत अदा करण्यात आला नाही. 

आर्थिक अडचणींचा सामना  मानधन, प्रवासभत्ता अडल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने जिल्हा परिषदेत धडक दिली. मात्र, निवेदन स्वीकारण्यास कुणीच अधिकारी नव्हते. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com