agriculture news in marathi, Bacterial disease infection to sheep in parbhani districts, Maharashtra | Agrowon

मेंढ्यांना जिवाणूजन्य आजाराचा संसर्ग

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

संसर्गित नर मेंढ्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणले आहेत. परीक्षणानंतरच नेमक्या आजाराचे निदान होईल. त्यानुसार मेंढपाळांना माहिती देण्यात येत आहे.
- डॉ. आनंद देशपांडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी.

परभणी ः सोन्ना (ता. परभणी) येथील मेंढ्यांना जिवाणूजन्य आजाराचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांत सुमारे ८० मेंढ्यांचा अकाली गर्भपात झाला आहे. हा आजार ब्रुसेल्लोसिस असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संसर्ग झालेल्या मेंढ्यांच्या (नराचे) रक्ताचे नमुने तपासणीसाठी आणले आहेत, अशी माहिती परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद देशपांडे यांनी दिली आहे. या आजारामुळे मेंढीपालकांचे तब्बल अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

दरम्यान, मेंढ्यांच्या या संसर्गजन्य आजाराबाबत पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ असल्याचे मेंढपाळांनी सांगितले.

गेल्या तीन महिन्यांपासून सोन्ना (ता.परभणी) येथील मुंजा जमरे, माणिक जमरे, भागवत जमरे यांच्या मेंढ्यांचा अकाली गर्भपात होत आहे. याबाबत मुंजा जमरे यांनी सोमवारी (ता.३) परभणी येथील पशुचिकित्सालयातील तज्ज्ञांना याबाबत माहिती दिली. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. नितीन मार्कंडेय यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद देशपांडे, डॅा. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. बाबूलाल कुमावत यांचे पथक सोन्ना गावाकडे रवाना केले. या पथकाने गर्भपात झालेल्या मेंढ्यांची तपासणी केली असता हा आजार ब्रुसेल्लोसिस असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

या आजाराबाबत माहिती देताना डॉ. देशपांडे म्हणाले की, या आजाराचे जिवाणू मूळतः मादी मेंढीमध्ये असतात. अशा प्रकारची मादी आणि सामान्य नर मेंढा यांचा रेतनाच्या वेळी संबंध आल्यास नर मेंढ्याला या आजाराचा संसर्ग होतो. संसर्ग झालेला नराचा कळपातील इतर मेंढ्यांशी रेतनाच्या वेळी संबंध आलेल्या प्रत्येक मेंढीला या आजाराचा संसर्ग होतो. यामुळे सुरुवातीला मेंढी गाभण राहते, परंतु गर्भाची ७५ टक्के वाढ झाल्यानंतर (११० ते १२० दिवस) अकाली गर्भपात होतो. यामुळे मेंढ्या पुढील आयुष्यात वांझ होतात. त्यामुळे अशा मेंढ्यांना खाटकाला विकल्याशिवाय पर्याय रहात नाही.

मेंढ्यांसोबत शेळ्या, गायी, म्हशी आदी जनावरांनादेखील हा आजार होतो. संसर्गित जनावरांच्या प्रजनन संस्थेची अयोग्य हाताळणी झाल्यास माणसालासुद्धा या आजाराचा संसर्ग होतो. या आजाराची माणसांमध्ये सांधेदुखी, अधून मधून ताप येणे अशी लक्षणे आहेत. प्रामुख्याने पशुवैद्यकांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

दक्षता घ्या...
ब्रुसेल्लोसिस आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी इतिहास माहित नसलेल्या नर मेंढ्याचा वापर कळपातील मेंढ्यांचे रेतन करण्यासाठी करू नये. गर्भपात झालेला गर्भ, जार हातमोजे घालून हाताळावा. जमिनीत खोल पुरून टाकावा. धुण्याच्या साबणाने हात धुवावेत.

प्रतिक्रिया
गेल्या तीन महिन्यांत आमच्या परिसरातील ८० मेंढ्यांचा अकाली गर्भपात झाला. यामुळे मेंढपाळांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- मुंजा जमरे, मेंढपाळ (सोन्ना, जि. परभणी)

 


इतर अॅग्रो विशेष
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...