बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला मजूरटंचाईची झळ

बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला मजूरटंचाईची झळ
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला मजूरटंचाईची झळ

नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून बाजरी पेरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजरीचे क्षेत्र वाढले असून, आता बाजरीचे पीक सोंगणीसाठी आले आहे. मात्र वाढलेली मजुरी, मजूरटंचाई यामुळे हंगामात काढण्या लांबणीवर जात आहेत. त्यामुळे बाजरी कापणी आणि काढण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे. मक्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली; मात्र तिच्यावर लष्करी अळीचे प्रादुर्भाव झाल्याने लागवड घटली. पर्यायी दुबार पेरणीत बाजरी पेरण्यात आली. आता बाजरी काढणीसाठी आली असताना मजुरीमध्ये झालेली वाढ व मंजूरटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला मका लागवडीचा खर्च, त्यात लष्करी अळीमुळे संपुष्टात आलेले पीक, पुन्हा दुबार पेरणी व आता वाढलेला काढणी खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  आता ऑक्टोबरमध्ये उन्हाच्या तडाख्यात बाजरी सोंगणीसाठी आली आहे. शेतीकामासाठी महिलांना २०० रुपये, तर पुरुषांना ३०० रुपये मजुरी दिली जाते. बाजरी कापणीसाठी मात्र महिला ४०० तर पुरुष ६०० रुपये मजुरीची मागणी करीत आहेत. त्यातच मक्ता पद्धतीनेही बाजरी कापणीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यातच चालू वर्षी पेरणी, निंदणी, सोंगणी व काढणी, मळणी व वाहतूक खर्च १८ ते २० हजारांवर गेला आहे. त्यात एकरी मिळणारे बाजरीचे उत्पादन ९ ते १० पोत्यांपर्यंत मिळत असल्याने उत्पन्नही १८ ते २० हजारांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे केलेला खर्च व मिळणारा परतावा सारखाच असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नसल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. मळणीसाठीही अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहे. उत्पादन खर्चाचा हिशेब करता बाजारातून खरेदी केलेल्या बाजरीपेक्षाही शेतातून उत्पादित केलेली बाजरी महाग ठरत आहे.  शेतमजूर निवडणुकांमध्ये व्यस्त  निवडणुकांसाठी होणाऱ्या प्रचारसभा, रॅली यांसाठी जमाव दिसण्यासाठी शेतमजुरांना राजकीय पक्षांतर्फे बोलविण्यात येत आहे. आकर्षक रोज व कमी श्रमाचे काम असल्याने मजूर सध्या त्यास पसंती देत आहेत. निवडणुकांमुळे शेतमजुरांची दिवाळी जरी गाइड होणार असली, तरी शेतकऱ्यांसाठी बाजरी काढणी हंगामासह इतर कामे अडचणीची ठरत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com