Agriculture news in marathi; Baglan and Deola talukas receive labor scarcity for millet harvest | Page 2 ||| Agrowon

बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला मजूरटंचाईची झळ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून बाजरी पेरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजरीचे क्षेत्र वाढले असून, आता बाजरीचे पीक सोंगणीसाठी आले आहे. मात्र वाढलेली मजुरी, मजूरटंचाई यामुळे हंगामात काढण्या लांबणीवर जात आहेत. त्यामुळे बाजरी कापणी आणि काढण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे.

नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून बाजरी पेरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजरीचे क्षेत्र वाढले असून, आता बाजरीचे पीक सोंगणीसाठी आले आहे. मात्र वाढलेली मजुरी, मजूरटंचाई यामुळे हंगामात काढण्या लांबणीवर जात आहेत. त्यामुळे बाजरी कापणी आणि काढण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे.

मक्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली; मात्र तिच्यावर लष्करी अळीचे प्रादुर्भाव झाल्याने लागवड घटली. पर्यायी दुबार पेरणीत बाजरी पेरण्यात आली. आता बाजरी काढणीसाठी आली असताना मजुरीमध्ये झालेली वाढ व मंजूरटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला मका लागवडीचा खर्च, त्यात लष्करी अळीमुळे संपुष्टात आलेले पीक, पुन्हा दुबार पेरणी व आता वाढलेला काढणी खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

आता ऑक्टोबरमध्ये उन्हाच्या तडाख्यात बाजरी सोंगणीसाठी आली आहे. शेतीकामासाठी महिलांना २०० रुपये, तर पुरुषांना ३०० रुपये मजुरी दिली जाते. बाजरी कापणीसाठी मात्र महिला ४०० तर पुरुष ६०० रुपये मजुरीची मागणी करीत आहेत. त्यातच मक्ता पद्धतीनेही बाजरी कापणीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यातच चालू वर्षी पेरणी, निंदणी, सोंगणी व काढणी, मळणी व वाहतूक खर्च १८ ते २० हजारांवर गेला आहे. त्यात एकरी मिळणारे बाजरीचे उत्पादन ९ ते १० पोत्यांपर्यंत मिळत असल्याने उत्पन्नही १८ ते २० हजारांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे केलेला खर्च व मिळणारा परतावा सारखाच असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नसल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. मळणीसाठीही अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहे. उत्पादन खर्चाचा हिशेब करता बाजारातून खरेदी केलेल्या बाजरीपेक्षाही शेतातून उत्पादित केलेली बाजरी महाग ठरत आहे. 

शेतमजूर निवडणुकांमध्ये व्यस्त 
निवडणुकांसाठी होणाऱ्या प्रचारसभा, रॅली यांसाठी जमाव दिसण्यासाठी शेतमजुरांना राजकीय पक्षांतर्फे बोलविण्यात येत आहे. आकर्षक रोज व कमी श्रमाचे काम असल्याने मजूर सध्या त्यास पसंती देत आहेत. निवडणुकांमुळे शेतमजुरांची दिवाळी जरी गाइड होणार असली, तरी शेतकऱ्यांसाठी बाजरी काढणी हंगामासह इतर कामे अडचणीची ठरत आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
वीजबिल माफ करा, अन्यथा असहकार आंदोलन ः...बुलडाणा ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे...
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊसअकोला ः गेल्या २४ तासांपासून वऱ्हाडात पावसाची झड...
नांदुरा तालुक्यातील ‘त्या’ कृषी...बुलडाणा ः या हंगामात चार शेतकऱ्यांच्या नावावर...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची...रत्नागिरी ः संततधार पावसाने सोमवारी (ता. १०)...
उडीद पिकावर किडींचा हल्लाबोलरोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : जिल्ह्यात सततच्या...
कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय...लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...