बागलाण तालुक्यात खरीपपूर्व मशागतींना वेग

बागलाण तालुक्यात खरीपपूर्व मशागतींना वेग
बागलाण तालुक्यात खरीपपूर्व मशागतींना वेग

नाशिक : बागलाण तालुक्यात खरीप हंगामपूर्व शेतीकामांना वेग आला असून, शेतीकामे व मशागती अंतिम टप्प्यात आल्या आहेत. चालू वर्षी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या बैल नांगराच्या मशागती कमी झाल्या असून, शेतकरीवर्ग बैलजोडीचा वापर न करता ट्रॅक्टरच्या मदतीने मशागती करताना दिसत आहे. नांगरट व इतर कामे लवकर होतील यासाठी ट्रॅक्टरचा वापर करताना सर्वत्र दिसत आहे. प्रतिएकरी १५०० ते २००० असे नांगरणीचे दर आहेत. त्यात डिझेलचे दर वाढल्याने नांगरणीच्या दरात वाढ झाली आहे.  चालू वर्षी प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उन्हाचा तडाखा अधिक आहे. पाणीटंचाई व चाऱ्याचा तुटवडा यामुळे पशुधन जगविणे जिकिरीचे झाले आहे. बदलत्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढत असून कमी क्षेत्रात व कमी पाण्यात अधिक उत्पादन या हिशोबाने शेतकरी आता ट्रॅक्टर, वेगवेगळे तंत्रज्ञान, फवारणी करून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याकडे वाटचाल करीत आहे.  तत्पूर्वी यंदा मे महिना संपल्याने जून महिन्याची सुरवात झाली असता पावसाचे आगमन लवकर होईल, या आशेने शेतकरी राहिलेली जमीन स्वतःच्या ट्रॅक्टरने किंवा भाडेतत्त्वावर घेऊन नागरणी व इतर मशागत करीत आहे. लवकर पाऊस येईल, या आशेवर बळिराजा वाट पाहतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com