आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं...

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं...
आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं...

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं... बैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन... - बहिणाबाई

पुणे : जवळपास निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात आज बैलपोळा सण मोठ्या पारंपारिक उत्साह आणि आनंदाने साजरा केला जात आहे. कमी-अधिक पाऊसमानाचे सावट या सणावर असले तरी बळीराजाने वृषभराजाप्रति आपली कृतज्ञता कोठेही कमी केलेली नाही. आप-आपल्यापरीने शेतकऱ्यांनी सण साजरा करण्याच्या तयारी केली आहे. सणा करिताचा बाजारहाट झाला असून आज दुपारपर्यंत आपल्या लाडक्या सर्जा-राजांसह गाय-वासरु आणि इतर पाळीव जनावरांच्या सजावटीचे काम चालेल. यानंतर गावात देवदर्शन झाल्यावर गावोगावी पोळा फुटेल. गावातून घरी आल्यानंतर वृषभराजाची मनोभावे पुजा केली जाईल...

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या (किंवा भाद्रपद अमावास्या) या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन त्यांची अंघोर घालण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) एक आंब्याच्या पानाचे मोठे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com