Agriculture news in Marathi Bajra sowing started increasing in Khandesh | Agrowon

खानदेशात बाजरीची पेरणी वाढू लागली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

जळगाव ः खानदेशात सुमारे ११ ते १२ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने कोरडवाहू कापूस, मका पिकाला फटका बसला. त्यात कापूस पिकात पाने खाणाऱ्या किडींचा हल्ला झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे पीक मोडण्याची वेळ आली. पीक मोडलेल्या भागात व पेरणीस उशीर झालेल्या शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीवर भर दिला आहे.

जळगाव ः खानदेशात सुमारे ११ ते १२ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने कोरडवाहू कापूस, मका पिकाला फटका बसला. त्यात कापूस पिकात पाने खाणाऱ्या किडींचा हल्ला झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे पीक मोडण्याची वेळ आली. पीक मोडलेल्या भागात व पेरणीस उशीर झालेल्या शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीवर भर दिला आहे.

बाजरीचे क्षेत्र खानदेशात यंदा चार ते पाच हजार हेक्‍टरने वाढण्याचा अंदाज आहे. कमी कालावधी व उशिरा पेरणीसाठी बाजरी पीक उपयुक्त मानले जाते. पावसाचा खंड पडल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती. ही पेरणी मागील आठवड्यात झालेल्या पावसानंतर सुरू झाली. सुमारे ५५ टक्के क्षेत्रात पेरणी रखडली होती. ही पेरणी शनिवारी (ता. २७), रविवारी (ता. २८) सुरू झाली. यात अनेक शेतकरी बाजरी पेरणीस पसंती देत आहेत. बाजरी पिकाचे उत्पादन मागील हंगामात अतिपावसाने वाया गेले होते; परंतु गेल्या रब्बी हंगामात बाजरीचे एकरी १२ ते १३ क्विंटल उत्पादन आले.

चांगले वाणही बाजारात उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीवर भर दिला. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, साक्री, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार, नवापूर, जळगावमधील भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, चोपडा या भागात बाजरीचे क्षेत्र अधिक आहे. खानदेशात मिळून सुमारे १६ ते १८ हजार हेक्‍टरवर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. बाजारात बाजरीचे दर स्थिर आहेत. सध्या १६५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर बाजारात मिळत आहे. दर स्थिर असल्याने व कमी कालावधीचे पीक म्हणून अनेक शेतकरी या पिकाकडे वळल्याची माहिती मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...