Bajra will be procured in Nashik district
Bajra will be procured in Nashik district

नाशिक जिल्ह्यात हमीभावाने होणार बाजरी खरेदी

शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंर्तगत आधारभूत किंमत २ हजार १५० रुपये दराने शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करून बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी केली होती.

येवला, जि. नाशिक : शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंर्तगत आधारभूत किंमत २ हजार १५० रुपये दराने शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करून बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी केली होती. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यासह जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत क्विंटल मागे १००० रुपयाचा अधिक लाभ होणार आहे.

हमीभावाअंतर्गत शासकीय बाजरी खरेदी केंद्रासाठी येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची नेमणूक केली आहे. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत २ हजार १५० रुपये प्रति क्विंटल दराने एफएक्यू प्रतीची शासकीय बाजरी खरेदी होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष दगडू टर्ले यांनी दिली. तालुक्यात ८ हजार हेक्टर बाजरीची पेरणी झालेली असून शुक्रवारपर्यंत ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभावाने बाजरी विक्री होत असून कवडीमोल भावात बाजरीच्या पिकाचा उत्पादन खर्चही निघणार नाही. बाजरीची शासकीय आधारभूत किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रति क्विंटल ११०० रुपये नुकसान आज शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.

१ नोव्हेंबरपासून नोंदणी शासकीय बाजरी ऑनलाइन नोंदणी १ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. बाजरी पिकाची सातबारा उता-यावर ऑनलाइन नोंद, ८ ‘अ’ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स बॅक पासबुक झेरॉक्सची पूर्तता बाजरी उत्पादकांनी करून नोंदणीसाठी संपर्क करावा असे आवाहन संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केली आहे.

सध्याचे बाजारभाव व शासकीय हमीभावात हजार रुपयांची तफावत आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बाजरी खरेदी सुरु करणे आवश्यक होते.येवल्यात शासकीय बाजरी केंद्रास मान्यता हा शेतकरी हिताचा निर्णय आहे. बाजरी हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल व मका ७५ ते ८० क्विंटल मर्यादेप्रमाणे खरेदी व्हावी ही अपेक्षा.  -अॅड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com