Agriculture news in marathi Balance in Parbhani district Verification of cotton continues | Agrowon

परभणी जिल्ह्यातील शिल्लक कापसाची पडताळणी सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

परभणी : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या परंतु, अद्याप मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक आहे. त्याची पडताळणी केली जात आहे.

परभणी : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या परंतु, अद्याप मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढले आहेत. 

भारतीय कापूस महामंडळ आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील ३७ हजार १३१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन आणि ४ हजार ९० शेतकऱ्यांनी ऑफलाइन अशी एकूण ४१ हजार २२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी रविवार (ता.३१)पर्यंत १० हजार २७५ शेतकऱ्यांचा ३ लाख २ हजार ९४३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. नोंदणीनुसार सुमारे ३० हजारावर शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बाकी आहे. 
परंतु, मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांकडे नेमका किती कापूस घरात शिल्लक आहे, यांचा अंदाज बांधता येत नाही. 

हमीभाव आणि खुल्या बाजारातील दर यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे राज्यातील तसेच अन्य राज्यातील व्यापारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासकीय केंद्रांवर कापूस विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऑनलॉइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांच्या पथकामार्फत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शिल्लक कापसाची पडताळणी केली जात आहे. 

हमीभावाने कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळून उर्वरित शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या (संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकासंह) तयार करुन तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या कामाचा दैनंदिन अहवाल तहसिलदार, सहाय्यक निबंधकांनी संयुक्तरित्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले. 
 

 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...