बटाटा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे

संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. लागवडीवेळी युरियाचा वापर करण्यापेक्षा अमोनिअम सल्फेट किंवा कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट या स्वरूपामध्ये नत्र द्यावे.
The use of potato planting machine has been increasing recently.
The use of potato planting machine has been increasing recently.

संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. लागवडीवेळी युरियाचा वापर करण्यापेक्षा अमोनिअम सल्फेट किंवा कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट या स्वरूपामध्ये नत्र द्यावे. बटाटा उगवणीवर होणारा हानिकारक परिणाम टाळता येतो.  पश्चिम महाराष्ट्रासाठी बटाटा पिकामध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापन करत असताना, सेंद्रिय खत २०-३० टन प्रति हेक्टरी लागवडीवेळी द्यावे. नत्राची पूर्तता करण्यासाठी अमोनिअम सल्फेट (नत्र २१ % आणि सल्फर २५ %), कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट (नत्र २५ %) आणि युरिया (नत्र ४६ %) द्वारे देऊ शकतो. नत्र हेक्टरी १०० किलो हे अमोनिअम सल्फेट ४७६ किलो किंवा कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट ४०० किलो किंवा युरिया २१७ किलो या स्वरूपात लागवडीवेळी द्यावे. नंतर भर लावताना (लागवडीनंतर ३० दिवसांनी) नत्र ५० किलो (युरिया १०९ किलो) प्रति हेक्टर द्यावे. लागवडीवेळी शिफारशीत पायाभूत नत्राची मात्रा कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट आणि युरिया यांच्या समान वापरातून देऊन, नत्राची उर्वरित मात्रा ही लागवडीनंतर महिन्याने भर लावतेवेळी युरियाद्वारे देऊ शकतो. यामुळे अतिरिक्त युरियाचा बटाटा उगवणीवर होणारा हानिकारक परिणाम टाळता येतो.  कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट मुळे नत्राची वापर क्षमता वाढू शकतो. लिचिंगद्वारे होणारा ऱ्हास कमी होण्यास मदत होते.

  • रासायनिक खतांची मात्रा देताना सरीमधून दिल्यास खतांचा थेट बीज कंद बरोबर संपर्क टाळू शकतो.  -उदासीन सामू असलेल्या जमिनीत अमोनिअम सल्फेट किंवा उदासीन सामू व अल्पशः क्षारयुक्त असलेल्या जमिनीत कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेटचा वापर करू शकतो. 
  • अमोनिअम सल्फेट तुलनात्मकदृष्ट्या महाग असते. गाळाच्या तसेच जास्त सामू असलेल्या जमिनीत युरियाचा पायाभूत स्वरूपात वापर करता येतो. मात्र, हेक्टरी ६० किलोपेक्षा अधिक नसावा. यातून काही अंशी बटाटा उगवण क्षमतेवरील विपरीत परिणाम टाळता येतो. 
  • स्फुरद ६० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३७५ किलो) आणि १२० किलो पालाश (२०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी पायाभूत स्वरूपात बटाटा लागवडीच्या वेळी द्यावे. 
  • खतांची मात्रा माती परीक्षण अहवालानुसार वेगवेगळी असू शकते. 
  • संशोधनाच्या नुसार नत्राच्या खत व्यवस्थापनाप्रमाणे पोटॅशची मात्रा पण लागवडीच्या वेळेस पायाभूत स्वरूपात तसेच भर लावताना (लागवडीनंतर ३० दिवसांनी) विभागून दिल्यास उत्पादनावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. 
  • उत्तर-भारत पठारी भागातील बटाट्याच्या ‘कुफरी बादशहा’ वाणावरील संशोधनामध्ये बटाटा लागवडीनंतर ५०-७० दिवसांनी २ % पोटॅश फवारणीतून एकूण पोटॅशच्या गरजेपैकी ४० किलो प्रति हेक्टर पोटॅशची बचत साधता येत असल्याचे दिसून आले आहे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराचा देखील बटाटा वनस्पतींच्या शारीरिक प्रक्रियेमध्ये प्रभाव दिसून आला आहे. या घटकांचा बटाट्याच्या गुणवत्तेवर देखील प्रभाव दिसून येतो. म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा बटाट्याच्या वाढ आणि विकास काळात खालील प्रमाणे फवारणीद्वारे वापर करू शकतो. 
  • फवारणी दुपारी ११ ते ३ या वेळेत करू नये.  
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी (ग्रॅम/ लिटर)
    झिंक सल्फेट
    कॉपर सल्फेट
    फेरस सल्फेट
    मँगेनीज सल्फेट
    ॲल्युमिनिअम मॉलीब्डेट
    सोडियम बोरेट /बोरेक्स

      टीप या लेखामध्ये केंद्रीय बटाटा संशोधन संस्था (सिमला), बटाटा संशोधन केंद्र, सरदारकृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ (गुजरात), तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) यांच्या शिफारशी दिलेल्या आहेत.

    संप्रक - डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग,  के. व्ही. के. सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com