Agriculture news in marathi Balanced use of chemical pesticides: Dr. Dhawan | Agrowon

रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित वापर करा : डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

परभणी : ‘‘रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित वापर करून उत्‍पादन खर्चात बचत होईल. मानवी आरोग्यावर, पर्यावरणावर त्याचा होणार विपरीत परिणाम कमी करता येईल,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी : ‘‘कपाशी हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. किटकनाशकांचा सर्वाधिक वापर कपाशीवरील कीड व्यवस्थापनासाठी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. हा खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित वापर करून उत्‍पादन खर्चात बचत होईल. मानवी आरोग्यावर, पर्यावरणावर त्याचा होणार विपरीत परिणाम कमी करता येईल,’’ असे प्रतिपादन  कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि कृषी किटकशास्त्र विभाग यांच्यातर्फे दर शनिवारी ‘सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापर’ यावर राज्यस्तरीय ऑनलाइन वेबीनार मालिका झाली. 

प्रा. पटाईत म्हणाले, ‘‘कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडींची ओळख, त्यांचा जीवनक्रम, प्रादुर्भाव, त्याची लक्षणे, किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी जीवनक्रम समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. कपाशी पिकांत शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात. काहीवेळा कीटकनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता नसतानाही फवारणी केली जाते. यामुळे उत्‍पादन खर्च वाढतो. काही वेळा एकापेक्षा जास्त कीटकनाशके सोबत बुरशीनाशके, विद्राव्य खते, आणि संप्रेरके यांचा एकत्रित वापर करून फवारणी केली जाते. त्यामुळे विनाकारण खर्चात वाढ होते.’’ 

‘‘एकत्रित वापरण्यामुळे काही वेळा कपाशीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन कपाशी जळू शकते. कीटकनाशकांचा संतुलित वापर, सोबत जैविक निविष्ठांचा वापर. जसे निंबोळी अर्क, काही बुरशीजन्य किटकनाशके वापरावी. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावरच किटकनाशकांचा योग्‍य वापर करावा,’’ असेही पटाईत यांनी सांगितले.

सूत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. आभार डॉ. मिलिंद सोनकांबळे यांनी मानले. झुम मिटिंग, युट्युबच्या माध्यमातून एक हजारपेक्षा जास्त शेतकरी, कृषी विस्‍तारक सहभागी झाले होते. 

आज आठवे सत्र

या वेबीनारचे आठवे सत्र आज (ता.५)  सांयकाळी ७ वाजता आयोजित केले आहे. यात ‘कीड व्यवस्थापनात जैविक निविष्ठांचा वापर’ यावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. श्रध्दा धुरगुडे ह्या  झुम मिटिंगद्वारे माहिती देतील. त्याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होईल.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...