agriculture news in marathi Balasaheb Taware takeover the charge as chairman of Malegaon Sugar Factory, Baramati | Agrowon

पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार बाळासाहेब तावरेंकडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये `माळेगाव`चे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी कारखाना प्रशासकीय पदभार रविवारी (ता.५) स्वीकारला.

माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये `माळेगाव`चे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी कारखाना प्रशासकीय पदभार रविवारी (ता.५) स्वीकारला. विशेषतः ही प्रक्रिया पूर्णत्वाला येईपर्यंत पोलिसांनी कारखाना कार्यस्थळावर मोठा बंदोबस्त ठेवला होता. मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत माझ्या संचालक मंडळाचा कार्यकाळ आहे, असा दावा केल्याने सत्ताधारी व विरोधकात परस्परविरोधी तणाव निर्माण झाली होता. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये (२५ फेब्रुवारी २०२०) राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल १७ विरुद्ध ४ जागांच्या फरकांनी विजयी झाला होता. त्यानुसार ८ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी शहाजीराज हिरे यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या घेतलेल्या बैठकीत बाळासाहेब तावरे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांची बिनविरोध निवड झाली होती. परंतु मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ (४ एप्रिल) संपेपर्यंत त्यांच्या कारभारात कोणीही हस्तक्षेप करता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. तावरे, उपाध्यक्ष श्री. कोकरे यांना आपला कार्यभार घेण्यासाठी एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागली. 

दरम्यान, अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर सर्वाधिक काळ (१४ वर्षे) काम केल्याची नोंद आहे. साखर धंद्यातील अनुभव व संचालकांच्या सहकार्याने सभासदांना सर्वाधिक ऊस दर देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी शरद पवार, अजित पवार यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल, असे तावरेंनी सांगितले. यावेळी संचालक केशवराव जगताप, मदनराव देवकाते, अनिल तावरे, योगेश जगताप, नितीन सातव, सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, संगिता कोकरे, तानाजी देवकाते आदींनी शिल्लक उसाबाबत आक्रमक भूमिका मांडली. 
...... 
उर्वरित उसाचे गाळप करणार...! 
माळेगाव कार्यक्षेत्रात अद्याप १ लाख टन ऊस गाळपाअभावी उभा आहे. कोरोना व्हायरसचा धोका, वाढती उष्णता, ऊस तोडणी मजुरांना घरी जाण्याची ओढ विचारात घेता शिवारातील उभ्या उसाची चिंता शेतकऱ्यांना आहे. त्यानुसार अध्यक्ष बाळासाहेब तावरेंनी लागलीच संचालक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उर्वरित ऊस गाळप उरकण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 
 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...