अडथळा दूर झाल्याने नगर जिल्ह्यात काॅँग्रेसची लाट : बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

नगर : जिल्ह्यात काॅँग्रेसची लाट आली आहे. पक्षात अनेक युवक प्रवेश करीत आहे. नवीन तरुणांना संधी प्राप्त होत आहे. पक्षाला ज्यांनी सोडले, ते फसले. सत्ता म्हणजे सर्व काही नसते. पक्षाची विचारधारा महत्त्वाची असते. पक्षात असलेला अडथळा दूर झाल्याने कार्यकर्त्यांना वाट मोकळी झाली आहे, अशी टीका काॅँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे कुटुंबीयांचा नामोल्लेख टाळत केली.

जिल्हा काॅँग्रेस समिती व संलग्नित सर्व आघाड्यांच्या कार्यकर्त्यांचा रविवारी नगर येथे मेळावा झाला. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार भाऊसाहेब कांबळे व सुधीर तांबे, युवक काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, नूतन जिल्हाध्यक्ष करण ससाणे, राजेंद्र नागवडे, जिल्ह्याचे निरीक्षक शरद रणपिसे, दादा पाटील शेळके  उपस्थित होते.

‘‘मी काॅँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असलो, तरी भाजपचा प्रचार करीन, असे काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणाले. पक्षश्रेष्ठींनी नूतन जिल्हाध्यक्षांची निवड करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,’’ असे म्हणत थोरात यांनी माजी जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. विरोधी पक्ष नेत्यांचा मुलगा भाजपात जाणे तसे दुर्दैवी आहे असे थोरात म्हणाले. काॅँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रित केले होते का? यावर  बोलताना थोरात म्हणाले, काॅँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना बोलावले होते. जे पक्षाचे आहेत, ते सगळे आले. येथे काय चाललेय ते वरिष्ठांना  माहिती आहे असा टोला त्यांनी मारला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com