पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना नेतृत्व करण्याची संधी  : बाळासाहेब थोरात

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा फरक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या जुन्यांचा मेळ साधत काँग्रेस राज्यात नव्या जोमाने उभी राहिलेली दिसेल. अनेकांच्या पक्षांतरानंतर रिक्त झालेल्या जागांवर तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तसेच राज्याचा मुख्यमंत्री आघाडीचाच असेल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर आम्ही भर देणार आहोत, असे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी रविवारी (ता.१४) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, की राजकारणात चढ-उतार होत असतात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांना पक्षात संधी देण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल. लोकसभा निवडणुकीनंतर काही लोक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. त्याचा आगामी काळात काँग्रेसवर फारसा परिणाम होणार नाही. उलट त्यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या जागांवर तरुणांना काम करण्याची संधी मिळेल. काँग्रेसवर यापूर्वीदेखील अनेकदा आघात झाले. मात्र नवनेतृत्व आणि जनतेने पुन्हा काँग्रेसला उभे राहण्याची संधी दिली. त्यातून काँग्रेस नव्याने उभी राहिली आहे. काँग्रेस सोडून गेलेल्यांची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. यापुढील काळात नवे आणि जुने असे सर्व जण एक दिलाने काम करून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणू. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चांगले काम केले आहे. राज्यातील लोकांना विश्वास द्यायचा आहे. पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे कामातून विश्वास अधिक भक्कम करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com