agriculture news in marathi Baliraj farmers union demand farmers not to harvest Sugarcane till they get One time FRP | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटील

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी येथे केले.

कऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीसह ६०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेला पाठिंबा मिळत आहे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी येथे केले.

एकरकमी एफआरपीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे तहसीलदार कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत ते मंगळवारी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ‘‘या आंदोलनालास विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दररोज शेतकरी समर्थन देत आहेत. साखरेचे दर वाढले. मात्र उसाचे दर वाढले नाहीत. आंदोलनाचा इतिहास कारखानदारांना, प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी. प्रशासनाने आंदोलनाची वेळ आणून देऊ नये. आम्ही अजूनही शांततेने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये. कारखानदार दोनच दिवसांत ऊसदराचा निर्णय घेतील.’’

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचे कारखाने आहेत. मंत्र्यांना कायद्याचा विसर पडला आहे. तो कायदा कसा असतो, ते दाखवून देण्याची धमक बळिराजा शेतकरी संघटनेत आहे.’’ 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...