agriculture news in marathi Baliraja farmers union agitate on sugarcane FRP in sangli | Page 4 ||| Agrowon

एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘बळिराजा’च्या संघर्ष यात्रेस प्रारंभ 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या सरकारचं करायचं काय खाली डोक वर पाय..’ अशा घोषणा देत येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून बळिराजा शेतकरी संघटनेच्या संघर्ष यात्रेला रविवारी (ता.७) सुरुवात झाली. 

सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या सरकारचं करायचं काय खाली डोक वर पाय..’ अशा घोषणा देत येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून बळिराजा शेतकरी संघटनेच्या संघर्ष यात्रेला रविवारी (ता.७) सुरुवात झाली. 

प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, विश्‍वास जाधव, अॅड. युनुस मुल्ला, जयसिंगराव उथळे, मोहनराव खराडे, सत्यजित माने, अशोक सलगर, सुधीर कदम, संजय जाधव, शामराव मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी दोनच्या संघर्ष यात्रेस प्रारंभ झाला. संघर्ष यात्रा दुपारी चारच्या दरम्यान कराड येथील दत्त चौकात पोहोचली. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना येथे अडवले. तुम्हाला इथून पुढे जाता येणार नाही, तुमचे म्हणणे आम्ही पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यापर्यंत पोहोचवतो. मात्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी नकार देत आम्हाला सहकारमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून घ्या, या मागणी वर ठाम होते. 

पोलिसांनी त्यास नकार दिला, त्यावर पोलिस आणि संघटनेतील पंजाबराव पाटील, बी. जी. पाटील चर्चा करताना म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एक रकमी एफआरपी दिली, मग सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने का एकरकमी एफआरपी देत नाहीत. एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही.’ त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले. एकरकमी एफआरपी आणि सहाशे रुपये घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे पाटील म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...
सोयाबीन बाजार सुधारलागेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय...
मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती :...मुंबई : आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (...
कागलच्या जनावरांच्या बाजाराला मिळतोय...कागल  : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार...
Big Breaking - बैलगाडा शर्यतींना...नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील बैलगाडा...
इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या...नाशिक  : लाल कांद्याची (Red Onion) आवक...
शिर्डीत सहकार परिषद; केंद्रीय...शिर्डी : पहिला सहकारी साखर कारखाना, अशी ओळख...