नाशिकमध्ये शेतमालविक्रीसाठी 'बळीराजा ते ग्राहकराजा’ उपक्रम

नाशिक : ‘कोरोना’च्या परिस्थितीत येथे ताजा व गुणवत्तापूर्ण भाजीपाला मिळावा, शेतकऱ्यांचा माल पडून राहू नये, यासाठी येथील द्राक्ष विज्ञान मंडळाने 'बळीराजा ते ग्राहकराजा' उपक्रम हाती घेतला आहे.
'Baliraja to graharaja' program for sale of agricultural goods in Nashik
'Baliraja to graharaja' program for sale of agricultural goods in Nashik

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाउन पाळण्यासाठी नियम कडक केले आहेत. अशा परिस्थितीत येथे ताजा व गुणवत्तापूर्ण भाजीपाला मिळावा, शेतकऱ्यांचा माल पडून राहू नये, यासाठी येथील द्राक्ष विज्ञान मंडळाने 'बळीराजा ते ग्राहकराजा' उपक्रम हाती घेतला आहे. सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून माफक दरात विकला जात आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात मागणी व पुरवठा साखळीचे नियोजन करण्यात त्यांना यश आले आहे. 

कृषी विभाग,आत्मा, नाशिक महानगरपालिका यांची परवानगी घेऊन विक्री सूरु आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी विभागानेही परवाने व ओळखपत्र दिली आहेत. ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन यांचेही सहकार्य आहे. शहराजवळील सभासद शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदीसह किमान हाताळणी केली जाते. आठवडाभर पुरेल असा ‘कॉम्बो पॅक’ तयार करून त्याची ३०० रुपयांना विक्री होते. ज्यामध्ये टोमॅटो, कांदे, बटाटे, कोथिंबीर, ढोबळी मिरची, कोबी, वांगे, फ्लॉवर, गाजर, हिरवी मिरची, पालक, लिंबू, काकडी, लसून यांसह द्राक्ष, खरबूज, टरबूज यांचे पर्याय आहेत. 

शहरातील कॉलेज रस्ता, गंगापूर रस्ता, भाभानगर, उपनगर, त्रंबकेश्वर रस्ता, पोलिस वसाहत, यांसह विविध नागरी सोसायट्यांत जाऊन विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील गोविंदनगर परिसर सील केल्याने येथील नागरिकांना भाजीपाला देण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या परवानगीने काम सुरू आहे, असे मंडळाचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले यांनी सांगितले. याकामी डॉ. ढिकले, उपाध्यक्ष चंद्रकांत बनकर, विशाल बनकर, भाऊसाहेब दुगजे व मंडळाचे सभासद प्रयत्नशील आहेत.  विक्रीदरम्यान विशेष खबरदारी 

भाजीपाला व फळांची विक्री करताना हातमोजे, मास्क, हेड कॅप, सॅनिटाइझर, संरक्षण सूट अशी उपाययोजना केली आहे. खबरदारी घेऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’सह विक्री सुरू आहे. ग्राहकाने मास्क लावावे, हँड सॅनिटाईझर वापरावे, एक मीटर अंतर ठेवून खरेदी करावी, अशी नियमावली ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com