agriculture news in marathi, Baliraja now has the base of the Ardha constellation | Agrowon

रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा नक्षत्राचा आधार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्यानंतर बळिराजाला आर्द्रा नक्षत्रातील सरींवर अवलंबून राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील पेरण्यांची कामे जवळपास पूर्णत्वास आहेत. उर्वरित शेतीची कामे सुरू आहेत. दिवसा पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे बळिराजा चिंताग्रस्त आहे. कातळावरील भातशेतीला ही परिस्थिती त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्यानंतर बळिराजाला आर्द्रा नक्षत्रातील सरींवर अवलंबून राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील पेरण्यांची कामे जवळपास पूर्णत्वास आहेत. उर्वरित शेतीची कामे सुरू आहेत. दिवसा पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे बळिराजा चिंताग्रस्त आहे. कातळावरील भातशेतीला ही परिस्थिती त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा १ जुनपासून २३९ मिलिमीटर एवढा सरासरी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधी साडेनऊशे मिमी पाऊस झाला होता. साडेसहाशे मिमी कमी पावसाची नोंद यंदा झाली आहे. पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे खरीप हंगाम दहा दिवस लांबला आहे. अशीच स्थिती राहिल्यास बळिराजापुढील अडचणीत वाढ होणार आहे.

यावर्षी जूनचा पंधरवडा पावसाविनाच गेला. त्यापूर्वी मे महिन्यातही वळवाच्या पावसानेही पाठ फिरवली. यावर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. मृग नक्षत्रात पेरण्या पूर्ण करून शेतकरी निवांत असतात. परंतु, जूनच्या अंतिम आठवड्यातही कडक उन्हामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्याची कामे लगबगीने मार्गी लावली. परंतु, पेरलेले बी रूजण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. 

२२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. मृग नक्षत्रात काही प्रमाणातच पाऊस पडला. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली. पाऊस सक्रिय झाला या आशेने शेतकऱ्यांनी गडबडीने मशागतीची कामे आटोपली. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली. मृगाच्या नक्षत्रात पावसाने फार उशिराने हजेरी लावली.

केवळ ढगाळ वातावरण आणि काही तासांच्या सरी वगळता पावसाने पाठच फिरवली आहे. ६ ते १९ जुलै या कालावधीत पुनर्वसू नक्षत्र असून या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. या दोन नक्षत्रावरच पावसाचे भवितव्य अवलंबून आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...