agriculture news in marathi, ballworm cotton Inspection start | Agrowon

बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे सुरू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात लागवड केलेल्या १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टरवरील कपाशीवरील गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. मंगळवार (ता.१२) पर्यंत बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या ६४ हजार ८३५ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. एकीकडे तक्रारींचा ओघ अजून सुरू आहे तर दुसरीकडे शेतावर जाऊन कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकाकडून पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात लागवड केलेल्या १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टरवरील कपाशीवरील गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. मंगळवार (ता.१२) पर्यंत बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या ६४ हजार ८३५ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. एकीकडे तक्रारींचा ओघ अजून सुरू आहे तर दुसरीकडे शेतावर जाऊन कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकाकडून पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता पडताळता यावी यासाठी नुकसानग्रस्त पिकांचे छायाचित्र जीपीएस सुविधा असलेल्या अॅंगल कॅम मोबाईल अॅपचा वापर करून काढले जात आहे. सर्व्हर डाऊन रहात असल्यामुळे आॅनलाईन छायाचित्र अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत.

त्यामुळे शुक्रवार (ता.१५) पर्यंत पंचनाम्याचे अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करणे शक्य होणार नाही. यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टर कापूस लागवड झाली आहे.

सद्यस्थितीत यंदा लागवड केलेल्या संपूर्ण क्षेत्रावरील कपाशीवरील गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. मंगळवार (ता.१२) पर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ८३४ शेतकऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यामध्ये परभणी तालुक्यातील १७ हजार ८२९ शेतकऱ्यांच्या तक्रारी, जिंतूर तालुक्यातील ८ हजार, सेलू तालुक्यातील ९ हजार ६४०, मानवत तालुक्यातील ६ हजार ८२३, पाथरी तालुक्यातील २ हजार २९१, सोनपेठ तालुक्यातील ४ हजार १९१, गंगाखेड तालुक्यातील २ हजार ४२५, पालम तालुक्यातील ९ हजार ६४०, पूर्णा तालुक्यातील ३ हजार ७९० तक्रारीचा समावेश आहे. अजून तक्रारीचा ओघ सुरुच आहे.

पंचनाम्यासाठी मोबाईल अॅप
गावातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाच्या पथकाकडून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे केले जात आहेत. शेतकऱ्यांने जी नमुन्यातील तक्रार अर्जामध्ये नमूद केलेल्या नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यतेची पडताळणी करण्यासाठी जीपीएस सुविधा असलेल्या मोबाईल अॅपव्दारे नुकसानग्रस्त पिकांचे छायाचित्र काढावे. सात बारा उताऱ्यावील नोंदीनुसार ३३ टक्के पेक्षा अधिक  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

शुक्रवार (ता.१५) पर्यंत नुकसानाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. परंतु अनेक ठिकाणी मोबाईलची कनेक्टीव्हीटाचा अभाव, सर्वहर डाऊन आदी कारणांमुळे आॅनलाईन छायाचित्र अपलोड करता येत नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. तसेच तक्रारीची वाढत चालेली संख्या यामुळे पंचनामे करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...