agriculture news in marathi, bamboo company will be formed, mumbai, maharashtra | Agrowon

बांबू क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी कंपनी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई  : राज्यातील बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र’ या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (ता. ७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई  : राज्यातील बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र’ या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (ता. ७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

गत काही काळापासून राज्यात बांबू क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून बांबू कारागिरांसाठी अनेक अल्पावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यासाठी त्रिपुरा येथील केन आणि बांबू सेंटरचे तांत्रिक सहाय्य घेण्यात येत आहे.

बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण ठरविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने शासनाला अहवाल सादर केला असून शासनाने समितीच्या शिफारसीसुद्धा स्वीकारल्या आहेत. राज्यात बांबू क्षेत्रास सक्षम करण्यासाठी समितीने राज्य सरकार, ट्रस्ट, खासगी कंपन्या, बँका आणि इतर चांगल्या संघटना एकत्रित येऊन महाराष्ट्र बांबू प्रमोशन कंपनी अर्थात बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान सुरू करावे, असे सूचविले आहे. हे प्रतिष्ठान कंपनी कायद्याच्या कलम ८ अन्वये नफ्यासाठी असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही कंपनी राज्य शासन व इतर संस्थांकडून प्रारंभी कॉर्पस फंडाने सुरवात करता येईल तसेच सीएसआर निधीचाही वापर करता येईल, नंतर ही कंपनी स्वत:च्या उत्पन्नातून आणि विविध प्रकल्पाची अंमलबजावणी करून चालू शकेल, अशी शासनाची भूमिका आहे.

यासाठी राज्यातील बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी शासनासह इतर एजन्सींचा समावेश करून नफा पायाभूत नसलेल्या कंपनीची म्हणजेच ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र’ या कंपनीची स्थापना करण्यास मान्यता देणे, प्रस्तावित कंपनीच्या संचालक मंडळामध्ये संचालक आणि अध्यक्ष म्हणून शासनाच्या प्रतिनिधींना नियुक्तीसह मान्यता देणे, या कंपनीची सुरवात करण्यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात २० कोटींचे एकवेळ अनुदान मंजूर करण्यास मान्यता देणे, या कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असोसिएशन ऑफ आर्टिकल्समधील शासन अटी व पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छूक नामांकित कंपन्यांना सहसभासद म्हणून भविष्यात समाविष्ट करून घेण्यात येईल. अशा आशयाच्या वनविभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. संघटित बांबू बाजाराला चालना देणे ही कंपनीच्या कामाची प्राथमिकता असून या माध्यमातून बांबू क्षेत्राच्या विकासासाठी मोठा हातभार लागणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
संशोधन केंद्राने दिले अवजारे दुरुस्तीचे...चंद्रपूर ः शेतकऱ्यांकडील बरीच कृषी अवजारे देखभाल...
डोंगरपायथ्याच्या भातपिकांवर रोगांचा...सिंधुदुर्ग ः ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मंचर बाजारात मागणीअभावी बटाटा वाणाची...मंचर, जि. पुणे  : येथील बटाटा बाजारपेठेवर...
नगर जिल्ह्यात खरिपात पीक कापणीचे...नगर  ः खरिपातील पिकांची उत्पादकता निश्चित...
नगरचे पाणी बीड नेणार ही फक्त अफवा ः...नगर  : मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा...
शेतीमाल विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
`येलदरी`त ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठापरभणी : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून...
बुलडाणा जिल्ह्यात वादळ, गारपिटीमुळे ८०...बुलडाणा  : गेल्या आठवड्यात बुलाडाणा...
मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहबसाठी...सिल्लोड, जि. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर...
मोदींनी देशाला बरबाद केलेः राहुल गांधीऔसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक आणि मागणी...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दडपशाही थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन...नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक...
गहू पिकावरील मावा किडीचा घेतला जातोय...आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र येथील...
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख...नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ...
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे...सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या...
हवामान बदल रोखण्यासाठी पावले उचलण्याची...हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेल (...
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा...नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे...
मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११०...
परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घटपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान...