बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी प्रोत्साहन; मुंबईत उद्या परिषद

बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी प्रोत्साहन; मुंबईत उद्या परिषद
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी प्रोत्साहन; मुंबईत उद्या परिषद

मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि संबंधित व्यक्ती यांच्यासाठी मंगळवारी (ता. १९) बांबू परिषदेचे आयोजन बीएसई कॉनव्हेन्शन सभागृहात करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या एकदिवसीय परिषदेत बांबू क्षेत्रातील समस्या आणि आव्हाने यावर ऊहापोह केला जाईल. देशात २०१७ या वर्षामध्ये ७४ देशांमधून एकूण १५४.९८ दशलक्ष डाॅलर्स मूल्याच्या बांबूची आयात करण्यात आली. चीन, इटली, मलेशिया, जर्मनी आणि अमेरिका हे सर्वांत माेठे बांबू आयातदार देश म्हणून ओळखले जातात. खासगी गुंतवणूक संस्थांच्या विकासासाठी सक्षम व्यावसायिक यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून औद्योगिक वापर तसेच बांबूचा उपयोग करणारे, बांबू कलाकार यांना कच्चा मालाचा दीर्घकालीन आणि स्थिर पुरवठा होण्यास मदत होऊ शकेल, असा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी परिषदेला प्रमुख मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‍घाटन पर भाषण होईल. वित्त, नियोजन आणि वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचेही या परिषदेत मार्गदर्शन होईल. या परिषदेमध्ये इंडियन ऑइल, बिर्ला सेल्युलाेज, आयकिया, आयटीसी, दालमिया सिमेंट्स, एडलवाईज, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, नॅशनल हायवे ऑथाॅरिटी ऑफ इंडियाची ग्रीन हायवेज मिशन या कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी या परिषदेत मार्गदर्शन करणार आहे.      बांबू लागवडीला प्राेत्साहन देण्याबराेबरच त्याचा चिरस्थायी पुरवठा हाेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र वन विकास महामंडळ (मर्यादित) इथेनाॅल, बायाे सीएनजी उत्पादन यासारख्या औद्याेगिक वापरासाठी बांबूच्या जैविक इंधनाचा (बायाेमास) पुरवठा करण्याच्या दृष्टीने ट्रंकी कंवा शेअररिंग आधारावर बांबू लागवडीसाठी टिश्यू कल्चरचा उपयाेग करण्याचा विचार करीत आहे. व्यावसायिक लागवड प्रकल्पासाठी किमान २५ एकर जागा असलेले इच्छुक शेतकरी किंवा अन्यजणांसाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सेवा पुरवठादार म्हणून मदत करण्याची तयारी दर्शवली असल्याचे वन मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. ही परिषद महाराष्ट्र शासन आणि वन खाते, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, बीएसई लिमिटेड आणि इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. बांबू उत्पादनातील संधी... अभियांत्रिकी, वास्तू रचना, बांधकाम, रेयॉन वस्त्रनिर्मिती, कागद उत्पादन, हस्तकला, खाद्य, औषध आदी विविध क्षेत्रांत बांबूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, त्याला महत्त्वपूर्ण असे पर्यावरणमूल्य आहे. बांबू प्रक्रियेमध्ये अलीकडे झालेल्या संशोधनानंतर बायो सीएनजी, २ जी इथेनॉल, ऊर्जानिर्मिती, लॅमिनेटेड फर्निचर, पॅनल्स, कोरुगेटेड शिट्स, विणलेली बांबू उत्पादने आदी व्यावसायिक बाजार संधी आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com