agriculture news in marathi, Bamboo cultivation will be done in 1451 hectors of Sindhudurg district | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार १४५१ हेक्टरवर बांबू लागवड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

फळलागवड करण्यावर आतापर्यंत भर देण्यात आला. एमआरजीएसच्या शासन निर्णयात बांबू लागवडीचा समावेश असल्याने या योजनेतून बांबू लागवड करण्याचे नियोजन आहे.
- के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग : एमआरजीएस योजनेअंतर्गत फळझाड लागवडीव्यतिरिक्त आता बांबू लागवडीसही प्राध्यान देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर त्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील १४५१ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत बांबू लागवडीतून शेतकऱ्याला हमखास उत्पन्न मिळत आहे. 

एमआरजीएस योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यात फळलागवड करण्यावर भर दिला गेला, परंतु गेल्या काही वर्षांत बदललेल्या वातावरणाचे फळलागवडीवर होणारे परिणाम प्रकर्षाने जाणवत आहेत. किफायतशीर ठरेल अशा बांबू लागवडीला आता प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यात १ हजार हेक्टर क्षेत्रात बांबू लागवड करण्यासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले होते. शेतकऱ्यांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४५१ हेक्टरवर बांबू लागवडीचे प्रस्ताव प्राप्त झाले. यामध्ये देवगड- १३६.१८ हेक्टर, वैभववाडी- १७५.४९ हेक्टर, कणकवली २४९.५२, मालवण १७५.२ हेक्टर, कुडाळ ३१७.३१, वेंगुर्ला ११९.२६, सावंतवाडी १६६.२७, दोडामार्ग १०२ हेक्टर अशाप्रकारे १४५१.२३ हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय बांबू लागवडीचे नियोजन (हेक्टरमध्ये):

देवगड १३६.१८
वैभववाडी १७५.४९
कणकवली २४९.५२
मालवण १७५.२
कुडाळ ३१७.३१
वेंगुर्ला ११९.२६
सावंतवाडी १६६.२७
दोडामार्ग १०२

 

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...