जीएम पिकांवरील बंदी अशास्त्रीय : घनवट

जीएम पिकांवरील बंदी अशास्त्रीय : घनवट
जीएम पिकांवरील बंदी अशास्त्रीय : घनवट

परभणी : जनुकीयदृष्ट्या परावर्तित (जी.एम.) पिकांवरील बंदीचा निर्णय निव्वळ राजकीय आहे. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सरकारने तत्काळ निर्णय घेऊन जीएम बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.

शेतकरी संघटनेतर्फे धुळे ते अकोटदरम्यान शेती तंत्रज्ञान प्रचार यात्रा मंगळवारी (ता. ४) काढण्यात आली. त्यानिमित्त मानवत येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमामध्ये घनवट बोलत होते. शरद जोशी न्यासचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी अध्यक्षस्थानी होते. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण, सुधीर बिंदू, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, मदन महाराज शिंदे, पंडितराव शिंदे, अशोक कुलकर्णी, संतोष गबाळे, हनुमान आमले, त्र्यंबक घुंबरे, रामभाऊ शिंदे, कैलास तवर, गणेश घांडगे, प्रल्हाद बरसाले, बाबा आवचार, भास्करराव निर्मळ, नंदकुमार जीवने, माधव खरात, सुनील भरड, बाबूराव देशमुख, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.

घनवट म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यासाठी आता काही अडचण नाही. जीएम बियाणे विक्रीस परवानगी दिल्यास शेतकऱ्यांना ते अधिकृतरीत्या खरेदी करता येईल. फसवणूक होणार नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. उत्पादन खर्चदेखील कमी होईल. ‘‘

``जगभरात जनुकियरीत्या परावर्तित पिकांचे सुधारित वाण विकसित होत आहेत. परंतु भारतात मात्र जीएम बियाण्यास बंदी आहे. क्रॉंग्रेसच्या राजवटीत पर्यावरणवादी आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या लाॅबीपुढे झुकून लादलेली बंदी भाजप सरकारच्या काळातदेखील कायम आहे. जीएम बियाणे बाळगणे, विकणे, चाचणी घेणे, शेतामध्ये लावणे गुन्हा असून त्यास एक लाख रुपये दंड आणि पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला आहे. जगाने स्वीकारलेले तंत्रज्ञान भारतील शेतकऱ्यांना मिळाले, तरच जगातील शेतकऱ्यांशी स्पर्धा करता येईल, असे घनवट यांनी नमूद केले.  

१० जूनला जीएम पिकांची अकोट येथे लागवड 

शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य नाकारणारा कायदा मान्य नाही. त्याविरुद्ध शेतकरी सविनय कायदेभंगाचे आंदोलन करतील. येत्या १० जून रोजी अकोट येथे जीएम पिकांची लागवड केली जाणार आहे. या वेळी पोलिसांनी अटक केल्यास शिक्षा भोगण्यास तयार आहोत, असा इशारा घनवट यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com