Agriculture news in Marathi Ban on mustard futures | Page 2 ||| Agrowon

खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या वायद्यांवर बंदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि स्पेक्यूलेशनवर नियंत्रणासाठी सरकारने एनसीडीईएक्सवरील मोहरीच्या वायद्यांवर बंदी घातली. काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी याची मागणी केली होती.

पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि स्पेक्यूलेशनवर नियंत्रणासाठी सरकारने एनसीडीईएक्सवरील मोहरीच्या वायद्यांवर बंदी घातली. काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी याची मागणी केली होती. मात्र मोहरीची कमी उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढलेले असताना वायद्यांवर बंदी घालून मोहरी तेलाचे दर खरच कमी होणार का? हे तर येणारा काळच ठरवेल. बंदी घातल्यानंतर सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसांत बाजार दबावात येईल, मात्र त्यानंतर पुन्हा दर वाढतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

यापूर्वी सरकारने हरभऱ्याच्या वायद्यांवरही बंदी घातली. याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागला होता. एनसीडीईएक्सवर डिसेंबरनंतरचा वायदा पुढील आदेश येईपर्यंत उघडला जाणार नाही, असे आदेश सेबीने दिले आहेत. वायद्यांवर बंदी घातल्याने मोहरी बाजार मागणी आणि पुरवठ्यावर चालेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्यापारातील सूत्रांच्या माहितीनुसार देशात फेब्रुवारीपासून सप्टेंबरपर्यंत ६३.२५ लाख टन मोहरीचे गाळप झाले आहे. म्हणजेच महिन्याला सरासरी ७.९ लाख टनांचे गाळप झाले. आता देशात १८.५ लाख टन मोहरीचा साठा आहे. हा साठा गाळपासाठी अडीच महिने पुरेल. त्यातच नवीन माल येण्यास जवळपास ५ महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे मिलर्सला कच्चा माल मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. 

या निर्णयामुळे शुक्रवारी (ता. ८) बाजार ऑक्टोबरच्या करारात ३५५ रुपये आणि नोव्हेंबरच्या करारात १७४ रुपयांच्या घसरणीसह उघडला. तर ऑक्टोबरचे वायदे ८३७६ रुपयांवर आणि नोव्हेंबरचे वायदे ८४३४ रुपयांवर बंद झाले.

एनसीडीईएक्स हे कृषी उत्पादनांचा मोठा वायदा बाजार आहे. मात्र, तूर, हरभऱ्यानंतर आता मोहरीच्या वायद्यांवर बंदी आणली आहे. यामुळे हा एक्स्चेंज प्लॅटफॉर्मच्या मूळ हेतूलाच हरताळ फासण्यासारखं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठ्यातील मोठी तुटीचा वेध घेण्यासाठी वायदे बाजार हे महत्त्वाचे साधन आहे. पेरणीच्या वेळी शेतकरी वायद्यांमुळे दराचा अंदाज घेऊन पेरणीचा निर्णय घेता येतो. त्यामुळे वायदेबंदी घालणे सयुक्तिक नाही.
- दीपक चव्हाण, शेतीमाल बाजार अभ्यासक


इतर अॅग्रोमनी
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...