agriculture news in Marathi ban removed from grapes exporters Maharashtra | Agrowon

द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन कारवाई रद्द

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड सापडल्याचा संशय व्यक्त करीत रशियाच्या प्लांट क्वारंटाइन विभागाने परत पाठविले होते. 

नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड सापडल्याचा संशय व्यक्त करीत रशियाच्या प्लांट क्वारंटाइन विभागाने परत पाठविले होते. त्यामुळे भारत सरकारच्या वनस्पती संरक्षण, संगरोध व संग्रह महासंचालनालयाने १४ निर्यातदार व संबंधित पॅकहाउसचे परवाने निलंबित करण्यात आले. अखेर बुधवारी (ता. २८) केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी निर्यातदारांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या वेळी तिढा सुटला असून, द्राक्ष निर्यातदार आणि पॅकहाउसचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 रशियामध्ये २०१९-२० च्या द्राक्ष हंगामात १५०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाली होती. त्यापैकी ४१ कंटेनरमध्ये कीड सापडली, असे वनस्पती संगरोध विभागाने कळविण्यात आल्यानंतर निर्यातदारांचे आणि पॅकहाउस परवाने निलंबित करण्यात आले. त्यामुळे संबंधित निर्यातदारांवर निर्यात हंगामाच्या तोंडावर टांगती तलवार होती. मात्र प्रत्यक्षात ही कीड आढळत नसल्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने कळविले होते. तसेच या विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर चौकशीत प्रश्‍नावलीला निर्यातदारांनी उत्तर दिले होते. 

ही कोंडी फोडण्यासाठी डॉ. भारती पवार यांच्यासमवेत द्राक्ष निर्यातदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषी मंत्रालय गाठले. त्यामध्ये अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, द्राक्ष निर्यातदार मधुकर क्षीरसागर, निर्यातदार परेश भयानी यांचा समावेश होता. या वेळी चर्चेनंतर हे निलंबन मागे घेण्यात आल्याचे पत्र निर्यातदारांना दिले आहे.

यासंबंधीचे आदेश केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. पी.एस. नैन यांनी दिले आहेत. याबाबत वनस्पती संगरोध विभागीय कार्यालयाचे प्रभारी,‘अपेडा’चे अध्यक्ष यांना कळविण्यात आले आहे. पॅकहाउसचा उपयोग हंगामानंतर द्राक्षांखेरीज इतर फलोत्पादन क्षेत्रासाठी करण्याचा प्रश्‍न केंद्रीय मंत्रालयाच्या या निर्णयानंतर मार्गी लागला आहे.

निर्यात करताना दक्षता घ्या !
रशियासाठी ‘टेबल ग्रेप्स’ निर्यात करताना भविष्यात अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचना निर्यातदार आणि पॅकहाउस चालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच कंटेनर आयात होणाऱ्या देशापर्यंत समाधानकारक परिस्थितीत पोचतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. फायटो सॅनिटरी प्रक्रियेकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...