agriculture news in marathi banana advisory | Agrowon

केळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​

डॉ.कृष्णा पवार, डॉ.जे.एस.चौरे,  सतीश माने
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

केळीवर प्रामुख्याने दोन प्रकारच्या फुलकिडी दिसून येतात. अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये अंडी घालणारी आणि अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातील अन्नद्रव्य शोषून घेणारी फुलकीड. 

सद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. केळीवर प्रामुख्याने दोन प्रकारच्या फुलकिडी दिसून येतात. अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये अंडी घालणारी आणि अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातील अन्नद्रव्य शोषून घेणारी फुलकीड. 

ओळख

 • लहान रेषेच्या आकार आणि १.५ मिमी लांब असते. 
 • रंग फिकट पिवळा ते सोनेरी तांबूस असून तिला तलम पंख असतात. पंखाच्या कडांना केसांची नाजूक झालर असते. 
 • कीड निष्क्रिय अवस्थेत असताना, पोटावर सरळ लांब काळी पट्टी असते.
 • प्रौढ मादी केळीचे खोड, पाने व फण्यांच्या बेचक्यात पेशींमध्ये अंडी घालते. अंडी यकृताच्या आकाराची असून डोळ्यांना दिसत नाहीत. 
 • बाल्यावस्था पिवळसर नारंगी रंगाची असते. अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातील अन्नरसाचे शोषण करतात. 
 • फुलकिडीची बाल्यावस्था साधारणपणे ८ ते १० दिवसांची असून त्यानंतर २ ते ५ दिवसानंतर कोशावस्थेत जाते. कोशावस्था जमिनीवर रांगू शकते. 
 • प्रौढ ६ ते १० दिवसांनी कोशातून बाहेर येतो.

लक्षणे

 • घड निसवल्यावर व सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून येतो. 
 • कीड घडातील अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातून बाहेर येणारा अन्नरस शोषण करते. 
 • प्रादुर्भावग्रस्त फळांच्या सालीवरील पेशी मरतात. त्यामुळे फळांवर तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे पडतात. फळे लालसर दिसू लागतात.  
 • फळांची साल लालसर झाली तरी त्याचा फळातील गरावर अनिष्ट परिणाम दिसून येत नाही. 
 • फळे पक्व झाल्यावर लालसरपणा वाढतो. 
 • जास्त प्रादुर्भाव झालेल्या फळांवर बारीक तडे पडलेले दिसतात. यामुळे फळांची गुणवत्ता खालावते. योग्य बाजारभाव मिळत नाही.

नियंत्रण 

 • बागेची स्वच्छता ठेवावी. बागेतील तण मुळासहित उपटून काढावे.
 • कापलेल्या झाडाचे अवशेष व मोडलेली केळफुले गोळा करून बागेबाहेर लांब टाकावीत.
 • प्रादुर्भावग्रस्त बागेतील कंद लागवडीसाठी वापरू नयेत. वापरायची असल्यास लागवडीपूर्वी कंद प्रक्रिया जरूर करावी.
 • केळफुल निसवताच ६ टक्के सच्छिद्रता असलेली प्लॅस्टिक किंवा पॉलीप्रोपॅलीनच्या पिशवीने घड पूर्णपणे झाकावेत.

जैविक नियंत्रण- (फवारणी प्रति लिटर पाणी)

 • व्हर्टीसिलीयम लेकॅनी (२x१० सी.एफ.यु ) २ ग्रॅम किंवा
 • अझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम)  ५ मिलि अधिक स्टिकर १ मिलि
 • शेवटचे पान निघाल्यावर किंवा केळफूल बाहेर पडतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी. 
 • फुलकिडीची कोशावस्था जमिनीत राहत असल्यामुळे,  जमिनीवर द्रवरूप बिव्हेरिया बॅसियाना (१x१० बीज कण प्रति ग्रॅम) (१.५%) ५ ग्रॅम

रासायनिक फवारणी- (फवारणी प्रति लिटर पाणी)

 • प्रादुर्भाव जास्त असल्यास,  ॲसिटामिप्रीड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मिलि
 • केळफूल निसवतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी. (लेबलक्लेम आहे) 

(टीप- जैविक कीडनाशक फवारणी पूर्वी किंवा नंतर १ आठवडा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर टाळावा.)

संपर्क- सतीश माने, ९२८४३७५५४५, ०२५७/२२५०९८६
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), केळी संशोधन केंद्र, जळगाव) 


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...