agriculture news in Marathi Banana and Cotton private procurement stopped Maharashtra | Agrowon

केळी, कापसाची खेडा खरेदी बंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

खानदेशात कापूस फारसा शेतकऱ्यांकडे शिल्लक नाही. परंतु, खेडा खरेदी कोरोना विषाणूमुळे लागू झालेली बंधने व भीती यामुळे बंद आहे.

जळगाव ः खानदेशात कापूस फारसा शेतकऱ्यांकडे शिल्लक नाही. परंतु, खेडा खरेदी कोरोना विषाणूमुळे लागू झालेली बंधने व भीती यामुळे बंद आहे. केळीची शिवार खरेदीदेखील वाहतूक, मजूर यासंदर्भातील अडचणींमुळे बंद आहे.

खानदेशात मार्चमध्ये कापसाची खेडा खरेदी वेगात सुरू असते. यंदा जागतिक मंदी व इतर कारणांमुळे कापसाची खेडा खरेदी फारशी गतीने सुरूच झाली नाही. मध्यंतरी खरेदी सुरू होती. ती मागील आठवडाभरात बंदावस्थेत आहे.

सध्या फक्त मध्य प्रदेश व गुजरातनजीकच्या नंदुरबार, तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल या भागांत कापसाची खरेदी सुरू आहे. तीदेखील अपवादानेच होत आहे. पुढे या खरेदीवर प्रतिकूल परिणाम होईल. कारण बाजारातील उलाढाल हळूहळू कमी होत आहे. 

केळीची बाजारात मागणी आहे. परंतु कोरोनाची दहशत ग्रामीण भागापर्यंत पोचली आहे. घरातच राहण्याचे आवाहन प्रशासन करीत असल्याने मजूर, वाहतूकदार शिवारात केळीच्या वाहतुकीसाठी जाण्यास नकार देत आहेत. शिवाय मध्य प्रदेशात केळी पाठवणुकीसंबंधी अडचणी येत आहेत. उत्तर भारतातील केळीची पाठवणुकही जवळपास थांबली आहे. मार्चमहिन्यात रोज २०० ते १८० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची काढणी होत असते. 

यंदा पाऊस चांगला झालेला असल्याने हंगाम यावल, रावेर, मुक्ताईनगर व नंदुरबार जिल्ह्यातही जोमात आहे. परंतु काढणी हळूहळू ठप्प होत आहे. बाजार समित्यांमध्ये केळीची खरेदी फारशी केली जात नाही. 

३५ कोटींची उलाढाल ठप्प
शेतकरी दुय्यम दर्जाची केळी बाजार समितीत पाठवितात. ९८ टक्के केळीची खानदेशात शिवार खरेदी केली जाते. परंतु, ही शिवार खरेदी ठप्प झाल्याने केळीदरांवर दबाव येत आहे. मागील दोन-तीन दिवसांत रोजची ३० ते ३५ कोटी रुपयांची केळी बाजारातील उलाढाल ठप्प झाल्याची स्थिती आहे, अशी माहिती मिळाली.


इतर अॅग्रो विशेष
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...