agriculture news in marathi, Banana costing Rs 100 per kg in Jalgaon | Agrowon

जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढ
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

जळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस क्विंटलमागे १००० रुपयांनी वाढ झाली. कांदेबागांमधून आवक वाढताच रावेर बाजार समितीने कांदेबागांचे स्वतंत्र दर जाहीर करायला सुरवात केली. सणासुदीमुळे केळीची मागणी टिकून आहे. यातच आता थंडीची चाहूल लागल्याने केळीची मागणी वाढू लागली आहे. एकट्या काश्‍मिरात मागील आठवड्यात प्रतिदिन पाच ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची पाठवणूक झाली. केळीचे दर १०३० वरून ११३० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.

जळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस क्विंटलमागे १००० रुपयांनी वाढ झाली. कांदेबागांमधून आवक वाढताच रावेर बाजार समितीने कांदेबागांचे स्वतंत्र दर जाहीर करायला सुरवात केली. सणासुदीमुळे केळीची मागणी टिकून आहे. यातच आता थंडीची चाहूल लागल्याने केळीची मागणी वाढू लागली आहे. एकट्या काश्‍मिरात मागील आठवड्यात प्रतिदिन पाच ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची पाठवणूक झाली. केळीचे दर १०३० वरून ११३० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.

काश्‍मिरमधील मोठ्या खरेदीदारांनी सावदा (ता. रावेर) येथे केळीसंबंधी मागणी कायम ठेवली असून, आगाऊ नोंदणी (ऑर्डर) दिल्या आहेत. कांदेबाग केळीत दर्जेदार केळी येत आहेत. चोपडा व जळगावमधील तापीकाठ व गिरणाकाठी दर्जेदार केळी असून, बॉक्‍समध्ये पॅकिंग करून उत्तरेकडे केळी पाठविली जात आहे. ऑनचे दर चोपडा तालुक्‍यातील वढोदा, विटनेर, मोहीदे, शिरपुरातील होळनांथे, घोडसगाव भागांतील केळी उत्पादकांना मिळाले. या भागात अनेर व तापी नदीकाठी केळीच्या बागांची कापणी जोमात सुरू असून, सावदा येथील व्यापारी याच भागातून केळीची खरेदी करून ती उत्तरेकडे पाठवित आहेत.

जळगाव तालुक्‍यातील गिरणा काठावरील खेडी खुर्द, आव्हाणे, पिलखेडा, गाढोदे, तापी काठावरील भोकर, किनोद, करंज, सावखेडा खुर्द या भागात दर्जेदार केळी उपलब्ध होत आहे. रावेर, यावल भागात केळीची उपलब्धता कमी झाली आहे. पिलबागांची कापणी जवळपास आटोपल्याने पिलबागांचे स्वतंत्र दर जाहीर करणे रावेर बाजार समितीने बंद केले. तर कमी दर्जाच्या केळीला (वापसी) ६३० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत.

सध्या जळगावसह नजीकच्या धुळे भागात केळी वेफर्ससंबंधी कच्‍च्या केळीची मागणी काहीशी वाढली आहे. कमी दर्जाची केळी यासंबंधी जळगावातील काही खरेदीदार घेत आहेत. यामुळे कमी दर्जाच्या केळीचे दरही बऱ्यापैकी आहेत. सध्या खानदेशात उष्ण व आर्द्रतायुक्त वातावरण असल्याने केळी लवकर पक्व होत आहे. दर १० ते १२ दिवसांत केळीची कापणी बागेत करून घ्यावी लागत आहे. रावेर,

यावल व मुक्ताईनगर भागांत केळीची कापणी सुरू व्हायला आणखी दोन महिने कालावधी आहे. परंतु जुनारी केळी बागांमध्ये दर्जेदार केळी उपलब्ध होत आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात मिळून प्रतिदिन १२० ट्रक केळीचा पुरवठा झाला. तर जळगाव, चोपडा, जामनेर व पाचोरा भागात मिळून प्रतिदिन १८० ट्रक केळीचा पुरवठा झाला. रावेर, मुक्ताईनगरमधून बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात केळीची पाठवणूक कमी झाल्याने बऱ्हाणपुरातही दर टिकून आहेत. तेथील बाजार समितीत प्रतिदिन २०० ट्रक केळीची आवक झाली. तेथे आवक कमी झाल्याची माहिती मिळाली यामुळे दरवाढ झाली आहे. पुढे दसरा, दिवाळीपर्यंत दर बऱ्यापैकी राहतील. ऑनचे दर (जादा) चोपडा, जळगावमधील दर्जेदार केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...