agriculture news in Marathi banana crop damage by rain Maharashtra | Agrowon

मोडून पडली काढणीला आलेली केळी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

काही दिवसांत जवळपास दोन वर्ष जपलेले केळीचे आठ एकरातील पीक हाती येणार होते. परंतु एका रात्रीत वादळी पाऊस झाला आणि नदीला पूर आला. त्यामुळे हाती येणारे पीक केळीच मोडून पडल्याने हातचे गेले. 

औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष जपलेले केळीचे आठ एकरातील पीक हाती येणार होते. परंतु एका रात्रीत वादळी पाऊस झाला आणि नदीला पूर आला. त्यामुळे हाती येणारे पीक केळीच मोडून पडल्याने हातचे गेले. 

मराठवाड्याच्या बहुतांश भागात सततच्या वादळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होते आहे. गत रविवारपासून (ता. १३) गुरुवार (ता. १७) पर्यंतच्या वादळी व जोरदार पावसाने सोयगाव तालुक्यातील वाडी सुतांडा येथील सर्जेराव जंजाळ यांच्या एकत्र कुटुंबातील जवळपास पंधरा एकरातील केळी पिकाचं वादळी पावसासह हिवरा नदीच्या पुराने मोठे नुकसान केले. त्याची आपबिती सर्जेराव जंजाळ सांगत होते. 

सर्जेराव जंजाळ यांच्या सहा भावंडांच्या एकत्र कुटुंबात जवळपास ६५ एकर शेती. यापैकी जवळपास पंधरा एकरावर केळीचे पीक. हिवरा नदीकाठच्या शेतातील आठ एकर केळीचे पीक काढणीला आले होते. परंतु रविवारी (ता १३) वादळी व जोरदार पाऊस झाला व नदीला पूरही आला. त्यामध्ये आठ एकरातील काढणीला आलेल्या केळीचे झाड अक्षरशः मोडून पडली. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस गुरुवारी जोरदार बरसला. त्यामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे जूनमध्ये नव्याने लागवड केलेल्या सात ते आठ एकर केळीतील अनेक रोपे व ठिबक संच, पाईप काही जनावर वाहून गेल्याचे जंजाळ म्हणाले. 

काढणीला आलेल्या केळी पिकावर सर्जेराव जंजाळ यांच्या कुटुंबाचा एकरी जवळपास ६० ते ७० हजार रुपये खर्च झाला होता. तर नव्याने लागवड केलेल्या सात ते आठ एकरातील केळी पिकावरही जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयांचा एकरी खर्च झाला होता. शिवाय काढणीला आलेल्या केळी पिकातून किमान २० ते २२ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना होणे अपेक्षित होते. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे हाती येणारे पीक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक संकट कोसळले आहे. 

झालेल्या नुकसानीची मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी पाहणी केल्याची माहिती सर्जेराव जंजाळ यांनी दिली. गाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सर्जेराव जंजाळ म्हणाले. 

खरीप पिकांना फटका 
खरिपातील कपाशी, सोयाबीन, उडीद, मका, बाजरी आदी पिकांची सततच्या पावसाने पुरती दानादान केली आहे. एकीकडे नदी ओढ्या काठच्या पिकांना पुराचा दणका बसत असतानाच इतर भागातील कपाशी सोयाबीन उडदाच्या पिकांना कोंब फुटणे सुरू झाले आहे. 

प्रतिक्रिया
एवढं मोठं नुकसान झालं काही सुचेना. शासन काय मदत करते देव जाणे. काही क्षेत्राचा विमा उतरविला होता. त्याचंही काय व्हतंय कुणास ठाऊक. 
- सर्जेराव जंजाळ, शेतकरी, वाडी, जि. औरंगाबाद 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...