जळगाव जिल्ह्यातील केळीला थंडीचा फटका

जळगाव जिल्ह्यातील केळीला थंडीचा फटका
जळगाव जिल्ह्यातील केळीला थंडीचा फटका

जळगाव  ः मागील सात ते आठ दिवसांपासून जळगावसह मध्य प्रदेशातील केळी पट्ट्यात किमान तापमान सतत ८ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले. त्यामुळे तीन ते चार महिने कालावधीच्या, निसवण सुरू असलेल्या केळीला मोठा फटका बसला आहे. मध्य प्रदेशात तापी नदीलगतच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील चार-पाच गावांमध्ये केळी पिकाची पाने काळी, पिवळी पडली आहेत.  १४ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान येताच, केळी पिकावर खानदेशात परिणाम व्हायला सुरवात झाली. नंतर जसे तापमान कमी होत गेले, तसे एक महिन्याच्या केळी रोपांमध्ये पाने पिवळी, काळी व्हायला सुरवात झाली. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्‍यातील गोरगावले, खेडीभोकरी, कठोरा, सनपुले, माचले, मंगरूळ भागांत एक ते तीन महिन्यांच्या केळीचे नुकसान झाले. जळगाव तालुक्‍यातही गाढोदे, किनोद, सावखेडा खुर्द, खेडी खुर्द भागातही हीच स्थिती आहे. चार ते पाच महिन्यांच्या केळीत पाने पिवळी पडली असून, करपा रोग आटोक्‍यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिदिन खत व्यवस्थापन करून फवारण्या घ्याव्या लागत आहेत.  मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार, दापोरा, बहादरपूर, इच्छापूर व इतर गावांमध्येही केळीचे थंडीमुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सध्या रावेरमधील तांदलवाडी, निंभोरा, मांगलवाडी, निंबोल, विटवा, केऱ्हाळे, करजोद, पाडळे भागांत केळीची निसवण सुरू आहे. परंतु तिच्या प्रक्रियेत थंडीमुळे बाधा पोचत आहे. आखूड केळी घड येत आहेत. काही घड निसवणीपूर्वीच पोग्यात अडकत आहेत. २० ते २५ टक्के नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर व जामनेर या भागांत सुमारे १८ ते २१ हजार हेक्‍टवरील केळीचे २० ते २ ५ टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे.   थंडीमुळे निसवणीवरील केळी बागेचे खत व्यवस्थापन प्रतिदिन करावे लागत आहे. त्यात खर्चही वाढत आहे. रावेरलगतच्या मध्य प्रदेशातील काही गावांमध्ये थंडीमुळे केळीचे आतोनात नुकसान झाले.   - अतुल पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com