खानदेशात केळीची लागवड दीड हजार हेक्टरने घटण्याचा अंदाज

या भागात केळीची लागवड स्थिर राहू शकते. सध्या शेतकरी लागवडीची तयारी करीत आहेत. बाजार सावरला, तर लागवड वाढूदेखील शकते. - विशाल महाजन, केळी उत्पादक,नायगाव (जि.जळगाव)
Banana cultivation is estimated to decrease by one and half thousand hectares in Khandesh
Banana cultivation is estimated to decrease by one and half thousand hectares in Khandesh

जळगाव : ‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेली बिकट स्थिती व बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन नव्या हंगामात खानदेशात केळीची लागवड घटण्याची शक्‍यता आहे. मृग बागांची लागवड खानदेशात सुमारे एक ते दीड हजार हेक्‍टरने कमी होण्याची शक्‍यता आहे. 

लागवड मुक्ताईनगर, रावेर भागात मात्र स्थिर राहील. सध्या रावेरातील तापी काठावरील गावांमध्ये केळी लागवड सुरू आहे. रावेरात क्षेत्र २१ हजार हेक्‍टरपर्यंत असते. यंदाही एवढेच क्षेत्र राहील. तर मुक्ताईनगरातही ३३०० ते ३३५० हेक्‍टरपर्यंत लागवड होईल. यावलमध्येही सुमारे पाच हजार हेक्‍टरपर्यंत लागवड अपेक्षित आहे. जामनेर, पाचोरा, नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा व धुळ्यातील शिरपूर भागात लागवड कमी होवू शकते. 

खानदेशात मृग बाग केळी रावेर, मुक्ताईनगर, यावल, तळोदा, अक्कलकुवा, शहादा भागात अधिक असते. यात आगाप केळी लागवड रावेर, यावल, मुक्ताईनगर, शहादा भागात केली जाते. तर, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने मृग बाग लागवड सुरू होते. खानदेशात केळीखालील क्षेत्र ५४ हजार हेक्‍टरपर्यंत राहील. यात जळगाव जिल्ह्यातील लागवड ४८ ते ४९ हजार हेक्‍टरपर्यंत राहू शकते.  लॉकडाऊन दूर होवून निर्यात, देशांतर्गत बाजारातील पाठवणूक सुकर झाली, तर बाजार सावरू शकतो. यानंतर लागवडीसंबंधीची घट फारशी राहणार नाही. कारण, कापूस बाजारही सुरवातीपासून अस्थिर आहे. रावेर, जामनेर, शहादा भागातील अनेक शेतकरी कापसाकडे फारसे वळणार नाहीत. त्याऐवजी केळीला पसंती देतील, असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com