agriculture news in Marathi banana damage by gava Maharashtra | Agrowon

गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता. सावंतवाडी) येथील शेतकरी श्रीराम अकुंश सावंत यांच्या बागेतील अडीचशे केळींचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. 

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता. सावंतवाडी) येथील शेतकरी श्रीराम अकुंश सावंत यांच्या बागेतील अडीचशे केळींचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. विक्रीयोग्य झालेल्या केळींचे नुकसान गव्यांकडून सुरू असल्यामुळे या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. 

विलवडे, बांदा, या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी लागवड आहे. अनेक शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणूनच केळीची लागवड केलेली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गव्यांकडून या पिकाला सतत उपद्रव होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. विलवडे मळावाडी येथील शेतकरी श्रीराम सावंत यांची केळीची बाग आहे. सध्या या बागेतील केळी विक्रीयोग्य झाली आहे. परंतु मंगळवारी रात्री उशिरा गव्यांच्या कळपाने श्री. सावंत यांच्या बागेतील अडीचशे केळींचे नुकसान केले. त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. 

बुधवारी सकाळी शेतकरी बागेत गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. हातातोडांशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे त्यांना धक्काच बसला. या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी वनविभाग आणि कृषी विभागाला नुकसानीची माहिती दिली आहे. या भागात गव्याचा उपद्रव वाढला आहे. भरदिवसा बागांमध्ये घुसून शेतीचे नुकसान करीत आहेत.

शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
बांदा गडगेवाडी येथील शेतकरी सदाशिव सावंत हे गुरे चारण्यासाठी गेले होते. ते परतत असताना रस्त्यालगत असलेल्या दोन गव्यांनी त्यांचा पाठलाग केला. श्री. सावंत यांनी तत्काळ एका झाडाचा आधार घेतला. त्यामुळे ते बचावले. भरदिवसा गव्यांनी पाठलाग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पालेभाज्यांसह विविध शेती केली जाते. मात्र गव्यांकडून सातत्याने नुकसान केले जात आहे. त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
 


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा १०८ हेक्टरवरील...पुणे : पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ फेब्रुवारीला खेड...
खानदेशात कांदा काढणी लवकरच सुरू होणार जळगाव : खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १८ हजार...
कोरोनामुळे अंतिम टप्प्यातील ऊस हंगाम...कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात...
सातबारा, आठ ‘अ’च्या अधिकारासह पंतप्रधान...नाशिक : केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध...
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सातारा...सातारा : जिल्ह्यातील नदीकाठी क्षारपड जमिनी...
बेदाणा निर्यात अनुदान बंदचा उत्पादकांना...सांगली ः गतवर्षी देशातून बेदाण्याची सुमारे ३०...
कृषी सहायकांची बैठक व्यवस्था योजना...नागपूर ः गावपातळीवर ग्रामविस्ताराला चालना मिळावी...
डिझेल दरवाढीने पीक काढणीचे दर वाढलेअकोलाः गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने...
‘माफसू’तील प्राध्यापकांना सातवा वेतन...नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान...
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी ...मुंबई : ‘‘मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम...
शेतमाल बाजारपेठेसाठी सरकारचे विशेष...मुंबई : ‘विकेल ते पिकेल’ या अभियानामध्ये पीक,...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या...सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव...
महावितरणचे राज्यात आता 'कृषी ऊर्जा...सोलापूर ः राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-...
...त्यानंतर वैधानिक मंडळे घोषित करू : ...मुंबई : ‘‘ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त बारा...
मानोलीत रब्‍बी ज्‍वारीची पीक प्रात्‍...परभणी ः ‘‘आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीस पोषणाच्‍या...
शेळ्या-मेंढ्यांना आधुनिक औषधोपचाराची...अकोला ः भारतातील बहुसंख्य अल्पभूधारक व भूमिहीन...
रानवाडी प्रकल्पाचा वनवास केव्हा संपणार?जलालखेडा, जि. नागपूर : नरखेड तालुक्यामधील पंचायत...
उन्हाळ्यासाठी चारवेळा मिळणार ‘इसापूर’चे...नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा...
भातगाव येथे आंबा, काजूची बाग होरपळलीगुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील भातगाव येथे...
गारपीटीने कांदा पातींसह स्वप्नेही तुटली...नाशिक : अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात अनेक कारणांनी...