agriculture news in Marathi, Banana growers get Ravi's return | Page 2 ||| Agrowon

रावेरातील केळी उत्पादकांना मिळणार विमा परतावा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

रावेर, जि. जळगाव : रावेर तालुक्‍यात या हंगामात अतिथंडी व अतिउष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना या नुकसानीपोटी परतावे मिळणार असून, तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडळांतील सुमारे नऊ हजार विमाधारक शेतकरी नुकसान भरपाईसंबंधी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी ६६ हजार रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे. 

रावेर, जि. जळगाव : रावेर तालुक्‍यात या हंगामात अतिथंडी व अतिउष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना या नुकसानीपोटी परतावे मिळणार असून, तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडळांतील सुमारे नऊ हजार विमाधारक शेतकरी नुकसान भरपाईसंबंधी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी ६६ हजार रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे. 

तालुक्‍यातील सुमारे साडेआठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी (एआयसी)द्वारे केळी पिकाचा विमा काढला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने सर्वच महसूल मंडळांतील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत. 

यावल-चोपडा भागातून पंचनाम्यांची मागणी
गेल्या वर्षी व या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. या तालुक्‍यांमधील अतिउपशामुळे विहिरी, कूपनलिकांची जलपातळी खालावली आहे. अतिउष्णतेमुळे केळी उद्‍ध्वस्त होत असून, अंदाजे २०० कोटी रुपयांचे नुकसान रावेर, चोपडा, यावल, रावेर भागांत झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे यांना निवेदन देण्यात आले.


इतर बातम्या
आरफळ योजनेच्या आवर्तनाची मागणीसांगली ः आरफळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू केले...
वाशीम तालुक्यात पीक उत्पादन वाढीसाठी...वाशीम ः या खरीप हंगामात वाशीम तालुक्यात गावनिहाय...
नाशिक जिल्ह्यात धरणांत यंदा २४ टक्के...नाशिक : जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत...
पुणे जिल्ह्यतील सर्वच तालुक्यांत ‘...पुणे  : टाळेबंदी शिथील झाल्यानंतर पुणे,...
‘कोरोना’ मुळे मुंबईच्या पाहुण्यांची... नगर  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वरचेवर...
वेल्ह्यात शासकीय दरात उपलब्ध होणार कृषी...पुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’वरील...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
कोल्हापुरात शेतकऱ्यांचा खतांसाठी झगडा...कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर आला तरी युरियासह...
इचलकरंजीतील जनावरे बाजार बंदचइचलकरंजी, जि. कोल्हापूर : येथील वडगांव बाजार...
सीताफळात एकरी एक लाख रुपये उत्पन्न...अकोला : लागवडीच्या नेटक्या व्यवस्थापनातून...
जळोची येथील जनावरे बाजार उद्यापासून...पुणे   ः ‘कोरोना’मुळे पुणे जिल्ह्यातील...
नांदेडमधील खासगी, ग्रामीण बॅंकांची पीक...नांदेड : जिल्ह्यात खरिप पीककर्ज मागणीसाठी मंगळवार...
महाबळेश्वरमधील दुर्गम भागातील...सातारा   ः ‘कोरोना’चा प्रादूर्भाव...
निविष्ठांच्या तक्रारी निवारणार्थ...हिंगोली : कोरोना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक...
सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी ५६५७...सोलापूर  : राज्याच्या इतर जिल्ह्यांतून तसेच...
नाशिकमध्ये शेतीशाळेतील महिला...नाशिक : जिल्ह्यात शेती विस्तार कार्यात उपक्रमाचा...
पुणे बाजार समितीतील फळे, भाजीपाला विभाग...पुणे  ः गुलटेकडी परिसरात बाजार समिती...
टोळधाड नियंत्रणासाठी जनजागृती करावी :...पुणे  ः राज्यातील काही भागात टोळधाडीने...
सोलापुरात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण...सोलापूर   ः ‘कोरोना’मुळे लॅाकडाऊन...
येवल्यात युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर...नाशिक : ऐन खरिपाच्या तोंडावर कृषी...