नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी उत्पादकांना `लॅाकडाऊन`चा फटका

लॅाकडाऊन पूर्वी केळीला दिड हजार रुपयापर्यंत दर होते. परंतू सध्या दर्जेदार केळीची तीनशे रुपये क्विंटलने खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत. त्यामुळे नुकसान होत आहे. - शिवाजीराव देशमुख, शेतकरी,बारड, जि.नांदेड. लॅाकडाऊनमुळे गावातील केळी तसेच अन्य फळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी सर्वाधिक भरडले गेले आहेत. केळीचे पीक येत्या काही दिवसांत काढणीला येईल. परंतू सध्यस्थितीत दरात झालेल्या घसरणीमुळे चिंता वाढली आहे. - एकनाथराव साळवे, शेतकरी,सिंगणापूर, जि.परभणी पाऊणे दोन एकरातील केळीच्या २३००पैकी जेमतेम ३०० झाडांची विक्री झाली. व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल चारशे रुपयांनी खरेदी करत आहेत. किरकोळ विक्रीचे दर मात्र ४० रुपये डझनपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचेअधिक नुकसान होत आहे. - मारुती देमे, शेतकरी,गिरगाव, जि.हिंगोली.
Banana growers hit 'lockdown' in Nanded, Parbhani, Hingoli district
Banana growers hit 'lockdown' in Nanded, Parbhani, Hingoli district

नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्याअंतर्गंत तसेच राज्याबाहेर केळी पाठविण्यावर मर्यादा आल्या आहेत. संचारबंदीमुळे स्थानिक मार्केटमधील मागणी कमी झाली आहे. केळीच्या घाऊक दरांत प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण होऊन उठाव नाही. उतरावयास आलेले केळीचे घड झाडावरच पिकत आहेत. शेतामध्ये शेकडो क्विंटल केळीची नासाडी होत आहे. उत्पादन खर्चाएवढे उत्पन्न मिळत नसल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड,भोकर, नांदेड तालुक्यात केळी लागवडीचे क्षेत्र आहे. अर्धापूर-मुदखेड तालुक्यातील केळी उत्पादक पट्ट्यातून उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यासह दिल्ली, दक्षिणेतील तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणावर केळी पाठविली जाते. परभणी जिल्ह्यात परभणी, मानवत, पाथरी आदी तालुक्यात, तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यात केळी लागवडीचे क्षेत्र आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील केळी अन्य राज्यात पाठवली जाते. परंतू सध्या वाहतुकीसाठी पुरेशा प्रमाणात वाहने उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीला मागणी नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लॅाकडाऊनपूर्वी केळीचे दर प्रतिक्विंटलला १२०० ते १५०० रुपये होते. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायोजनांतर्गंत स्थानिक मार्केटमधील केळी खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प राहू लागले आहेत. त्याचबरोबर आठवडे बाजार भरविणे देखील बंद करण्यात आले. मागणी कमी झाली आहे. 

केळीची शेतातून अल्प दराने सुध्दा खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत. दररोज शेकडो क्विंटल केळीची नासाडी होत आहे. उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com